निलेश राणे : ‘शरद पवारांनी नाना पटोलेंना पान टपरी वालाचं करून टाकला’ | पुढारी

निलेश राणे : 'शरद पवारांनी नाना पटोलेंना पान टपरी वालाचं करून टाकला'

पुढारी ऑनलाईन डेस्क : निलेश राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करून म्हणाले की, अरे रे रे… पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची लायकी खूप चांगली ओळखता. नाना पटोले आत्ता कुठे स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत बघू लागले होते की पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाचं करून टाकला.

अधिक वाचा 

Twitter ने अखेर तक्रार अधिकारी नेमला; नव्या आयटी मंत्र्यांच्या इशाऱ्याने तीन दिवसात उपरती!

समान नागरी कायदा हा केंद्राचा विषय, शरद पवार यांचे भाष्य

शरद पवार काय म्हणाले ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोलेंच्या टीकेला थेट उत्तर टाळले.

ते म्हणाले की, पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी प्रतिक्रिया दिली असती.

नाना पटोलेंनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देण्यास पवार यांनी नकार दिला.

विधानभवनातील राड्याच्या विषयावर पवार म्हणाले, गोंधळ झाला. त्यावर विधानसभेने निर्णय घेत शिक्षा केली.

आता ते कशाला जुने उकरून काढायचे. ज्यांनी चुकीचे काम केले असे विधानसभेला वाटले त्यावर त्यांनी एक वर्षाच्या शिक्षेचा निर्णय घेतला असे शरद पवार म्हणाले.

अधिक वाचा

एमी जॅक्सन जेव्हा ऐश्वर्या राॅयचा ‘ताे’ फोटो शेअर करते

आसाम : “हिंदू मुलाने हिंदू मुलीला खोटं बोलला, तर तोही जिहाद आहे”

नाना पटोले काय म्हणाले होते?

नाना पटोले लोणावळ्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती.

उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यास चालतो.

मी बोलल्यावर खुपतं अशी टीका केली होती. मी स्वबळाचे बोललो, यावर माघार घेणार नाही. त्यामुळे कामाला लागा, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.

हे ही वाचलं का?

अधिक वाचा

लखनऊमध्‍ये ‘एटीएस’ची मोठी कारवाई, दोन दहशतवादी जेरबंद

भाजप : Google वर जाहिरातीत भाजपचा कॉंग्रेसपेक्षा सहा पट अधिक खर्च

video : दिलीप कुमार आणि पुण्याचा ऋणानुबंद

Back to top button