लखनऊमध्‍ये ‘एटीएस’ची मोठी कारवाई, दोन दहशतवादी जेरबंद | पुढारी

लखनऊमध्‍ये 'एटीएस'ची मोठी कारवाई, दोन दहशतवादी जेरबंद

लखनऊ; पुढारी ऑनलाईन : लखनऊमध्‍ये दोन दहशतवादी जेरबंद करण्‍यात आले. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ही धडक कारवाई केली. दोन दहशतवादी जेरबंद झाल्‍याने आणि त्‍यांच्‍याकडे दाेन प्रेशर कुकर बॉम्‍ब मिळाल्‍याने उत्तर प्रदेशमध्‍ये एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा

काकोरी पोलिस ठाण्‍यातील दुबग्‍गा परिसरातील एका घरात संशयित लपले असल्‍याची माहिती एटीएसला मिळाली. या परिसरात एटीएसने छापा टाकला.

अल कायदा या संघटनेचा दहशतवाद्‍याला स्‍फोटकासह अटक करण्‍यात आली. तर सीतेबिहार कॉलनीमध्‍ये टाकलेल्‍या छाप्‍यात आणखी एकाला अटक करण्‍यात आली.

अधिक वाचा 

राज्‍यात मोठा दहशतवादी हल्‍ला करण्‍याचा कट

एटीएसने दहशतवाद्‍यांकडून दोन प्रेशर कुकर बॉम्‍ब व अर्धवट तयार केलेला टायमर जप्‍त केला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्‍ये राज्‍यात मोठा दहशतवादी हल्‍ला करण्‍याचा त्‍यांचा कट होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दहशतवादी सापडलेल्‍या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

५ जुलै रोजी एटीएसने एका संशयिताला अटक केली होती. त्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार रविवारी सकाळी सिराज, रियाज आणि शाहिद उर्फ गुड्‍डू आणि वसीम या संशयितांच्‍या घरांवर छापा टाकण्‍यात आला. चौघांना ताब्‍यात घेवून चौकशी करण्‍यात आली. यानंतर पोलिसांनी वसीम याला अटक केली.

अधिक वाचा 

शाहिद याने सीता विहार कॉलनीतील आपल्‍या पाच घरे भाड्याने दिली आहेत. येथे वसीम राहत होता.एटीएसने अटक केलेले दोन्‍ही दहशतवादी हे अल कायदा संघटनेचे आहेत. दोघेही पाकिस्‍तानसाठी काम करीत होते.एसटीएसने दोघांकडू मोठ्या प्रमाणावर स्‍फोटके बंद केल्‍यहाने घातपाताचा मोठा कट उधळला गेला आहे.बॉम्‍बशोधक पथकाला पाचारण करण्‍यात आले. या परिसरात स्‍थानिक पोलिसांच्‍या मदतीने शोधमोहित सुरु असल्‍याची माहिती एटीएसने दिली.

हेही वाचलं का ?

व्‍हिडिओ पहा : पी.ओ.पी च्या मूर्तींमुळे खरंच प्रदूषण होते का?

Back to top button