काॅंग्रेस : “मी स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम आहे”, नाना पटोलेंचं वक्तव्य | पुढारी

काॅंग्रेस : "मी स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम आहे", नाना पटोलेंचं वक्तव्य

पुणे, पुढारी ऑनलाईन : काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच लोणावळ्यात पार पाडला. यावेळी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “स्वबळाच्या नाऱ्यावर मी ठाम आहे”, असे थेट बोलत नाना पटोले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देतात. शिवसेनेला कामाला लागा म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिलेले चालते. मी स्वबळाची भाषा बोलू लागलो, तर त्रास होतो. हे योग्य नाही. स्वबळाच्या घोषणेवर मी ठाम आहे”, असे मत नाना पटोले यांनी मांडलेले आहे.
पटोले म्हणाले की, “पुण्याचे पालकमंत्री बारामतीकर आहेत. अजित पवार काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांची काम करत नाहीत. यात संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आपण म्हणतो. पण, शेवटी त्यांचं एेकायचं की नाही हेसुद्धा तेच ठरवतात”, अशी उघडपणे पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.
“कोणत्याही समित्यांवर नावं पाठवायची असतील, तर तिथं संपर्कमंत्र्यांची नाही तर पालकमंत्र्यांची सही लागते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपली ताकद कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रीत करा. काॅंग्रेसने स्वबळावर निवडणुका लढल्या पाहिजेत, या म्हणण्यावर मी ठाम आहे”, असे पाटोळे म्हणाले.
“काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागला लागवे. ज्यांना समजोता करायचा नसेल आणि सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा असले त्यांना आपण काही बोलायचं नाही. पण, तो राग आपली ताकद बनवा आणि पुण्यात आपला पालकमंत्री होईल, अशी शपथ घ्या”, असं आवाहनही पटोले यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
हे वाचलंत का?

हे पाहिलंत का? 

कोयना पर्यटन : धबधबे, अभयारण्य, धरणं, मंदीरं, गडकिल्ले आणि बरंच काही…

Back to top button