आसाम : “हिंदू मुलाने हिंदू मुलीला खोटं बोलला, तर तोही जिहाद आहे” | पुढारी

आसाम : "हिंदू मुलाने हिंदू मुलीला खोटं बोलला, तर तोही जिहाद आहे"

गुवाहाटी, पुढारी ऑनलाईन : आसाम राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, “जर एक हिंदू मुलगा हिंदू मुलीला खोट बोलत असेल, तर तोदेखील जिहाद आहे. कॅबिनेट या विषयावर लवकर कायदा करणार आहे”, हे महत्वाचे विधान करून राजकीय वर्तुळात चर्चेला फोडणी दिलेली आहे.

हिमंत बिस्वा सरमा पुढे म्हणाले की, “हिंदुत्व ५००० वर्षांपुर्वीचं आहे. हिंदू जीवनाची एक वेगळी पद्धत आहे. बहुतेक धर्मांचे अनुयायी हे हिंदू धर्माचे वशंज आहेत. त्यामुळे हिंदूला बाजूला केले जाऊ शकत नाही. कारण, याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या मातृभूमीपासून दूर चालला आहात.”

“लव्ह जिहाद, या शब्दावरच माझा आक्षेप आहे. कोणत्याही महिलेला धोका देण्याची परवानगी देता कामा नये. हे सरकार कोणत्याही महिलेला धोका देणाऱ्याला सहन करणार नाही. तो हिंदू असो किंवा मुस्लीम! आमच्या बहिणींची सुरक्षा करण्यासाठी, संबंधितावर कारवाई केली जाईल”, असंही मत त्यांनी मांडलं.

“शेजारील राज्यांच्या सीमेवर तणाव आहे. आसाम-नागालॅण्ड, आसाम-मिझोराम या दोन राज्याच्या सिमांवर तणाव वाढत चालला आहे. आमच्या संविधानात्मक सिमांच्या रक्षणासाठी सीमेवर पोलिस तैनात केलेले आहेत. चर्चेसाठी आम्ही तयार आहे. पण, आमच्या जमिनीवर अतिक्रमण आम्हाला मान्य नाही”, असं आसामचे मुख्यमंत्री म्हणाले.

हिमंत बिस्वा सरमा राज्यातील कोरोना परिस्थितीवर म्हणाले की, “आपल्या राज्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण समोर आलेला नाही. जिनोमीक अनुक्रमण आपण करत आहोत. पंतप्रधान नरेद्र मोदी पुर्वेकडील राज्यांतील कोरोनाची परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मंगळवारी ११ वाजता बैठक घेणार आहेत”, अशीही माहिती त्यानी दिली.

पहा व्हिडीओ : प्लास्टर ऑफ पॅरिसमुळं खरंच प्रदुषण होतं का?

हे वाचलंत का? 

 

Back to top button