सीमाप्रश्न खटल्यातून आणखी एका न्यायमूर्तींची माघार | पुढारी

सीमाप्रश्न खटल्यातून आणखी एका न्यायमूर्तींची माघार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या खटल्यातूून स्वतःहून माघार घेतली आहे. खटल्याच्या सुनावणीसाठी खंडपीठ स्थापण्यासाठी प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवले आहे. परंतु, खंडपीठातून न्या. अरविंद हे स्वतः बाजूला झाल्याने सुनावणी आणखी लांबवण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत या खटल्याच्या सुनावणीतून चार न्यायमूर्तींनी स्वतःहून माघार घेतली आहे. न्या. एस. अब्दुल नजीर, न्या. मोहन एम. शांतनागौडर, न्या. बी. व्ही. नागरत्ना तसेच न्या. अरविंद कुमार यांचा त्यात समावेश आहे. हे सर्व न्यायमूर्ती कर्नाटकातील आहेत.

Back to top button