

हिंदू तरुण-तरुणी आपल्या शुल्लक स्वार्थासाठी धर्मपरिवर्तन करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक ( RSS chief ) मोहन भागवत यांनी केले. विवाहासाठी हिंदू तरुण-तरुणी धर्म परिवर्तन कसे करत आहेत?, असा सवाल करत आपल्या धर्मावर गर्व असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. परिवार प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.
भाषा, भोजन, भजन, भ्रमण, भूषा आणि भवन या माध्यमातून सर्वांनी आपल्या मूळ संस्कृतीची जपवणूक करावी, असे आवाहन करत सरसंघचालक ( RSS chief ) मोहन भागवत यांनी कुटुंबाच्या विकासासाठी सहासूत्री मंत्रही या वेळी दिला.
आपण आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करत नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन देणे गरजेचे आहे स्वत:वर आणि आपल्या धर्मावर गर्व करावा, अशी शिकवण . मुलांना देणे गरजेचे आहे, असेही भागवत म्हणाले.
यावेळी कुटुंबाच्या विकासाबाबत बोलताना सरसंघचालक ( RSS chief ) भागवत म्हणाले, आठवड्यातील एक दिवस कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रीत भोजन करावे. यावेळीआपल्या परंपरा आणि चालिरीती याची माहिती एकमेकांना द्यावी. यानंतर सर्वांनी याची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी नमूद केले.
घरामध्ये सर्वांनी आपली मातृभाषेतूनच बोलावे. तसेच अन्य भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच आपल्या सर्व सणांवेळी पारंपरिक वेषभूषाच करावी, असेही ते म्हणाले.
आपल्या देशात सुमारे आठशे प्रकारचे भोजन तयार होते. उत्तराखंडमध्ये असे अनेक प्रकारचे भोजन परंपरा आहे. सर्वसामान्यपणे आपल्या राज्यात असणार्या हवामानानुसाच आहार असावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
भ्रमण ही संकल्पना स्पष्ट करताना भागवत म्हणाले. तुम्ही संपूर्ण जग फिरले पाहिजे. मात्र चितोडगडमधील हल्दीघाट आणि जालियनवाला बाग येथेही भेट दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या घरामध्ये महात्मा गांधी. भगत सिंह, डॉ. आंबेडकर आणि वीर सावरकर यांचे छायाचित्र लावावे. कुटुंबातील सर्वांना रामायणाची कथा सांगावी. त्यातूनच मुलांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कुटुंब सक्षम असले तरच समाज सक्षम होईल. यातूनच निद्रेच्याअधीन झालेल्या समाजाला जागे करता येईल. भारत विश्व गुरु होईल. गार्हस्थ्य आश्रमात तुमही राहत असला तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबरच जवळच्या परिसरातील नागरिकांच्या हिताचाही विचार करा, असे आवाहनही सरसंघचालक ( RSS chief ) मोहन भागवत यांनी केले.