World Indexes Fund : भारतीयांना परदेशी शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी | पुढारी

World Indexes Fund : भारतीयांना परदेशी शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी

भरत साळोखे

मागील आठवड्याच्या लेखात लिहिल्याप्रमाणे आपण या लेखात HDFC Developed World Indexes Fund of Funds आणि ICICI Prudential Nasdag 100 Index fund यांची माहिती घेऊ!

HDFC Developed World Indexes Fund आणि विक्रीसाठी पुन्हा खुला झाला आहे. या फंडाची प्राथमिक साधारण माहिती खालीलप्रमाणे आहे.

बेंचमार्क : MSCI World Index
किमान गुंतवणूक : रु. 5000/-
एक्झिट लोड : 1 महिन्याच्या आत गुंतवणूक काढली तर 1%
व्यवस्थापन खर्च : 1 %

या प्रकारच्या फंडाचे वर्णन Diversified Index Fund With Passive Management असे करता येईल. Passive फंड हे प्रत्यक्ष शेअर्समध्ये गुंतवणूक करत नसल्यामुळे त्यांचा व्यवस्थापन खर्च अतिशय कमी असतो. या फंडातही तो 9 टक्का इतका कमी आहे. हा फंड ज्या इतर पाच फंडांमध्ये गुंतवणूक करणार आहे, ते खालीलप्रमाणे आहेत.

1) CSIF (IF) MSCI USA Bule USITS ETF
2) csif (lux) Equity Europe
3) CSIF (LUX) Equity Japan
4) CSIF (LUX) Equity Pacific Japan
5) CSIF (LUX) Equity Canada

या पाचही फंडांचे व्यवस्थापन Credit Suisse या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँकेकडे आहे. Credit Suisse ही स्वित्झर्लंडची जगातील सर्व प्रमुख शहरांमध्ये कार्यालये असणारी, Investment Banking, Provate Banking, Asset Management या क्षेत्रात सेवा पुरवणारी एक विश्वसनीय कंपनी आहे. हे पाचही फंड MSCI World Index च्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. MSCI World Index हा जगातील 23 विकसित देशांमधील लार्ज आणि मिड कॅप कंपन्यांचा समावेश असणारा इंडेक्स आहे. 23 विकसित देशांमधील 1583 कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

दुसरा बाजारात आलेला इंटरनॅशनल इंडेक्स फंड म्हणजे ICICI Prudential Nasdag 100 Fund! वरील फंडाप्रमाणे हा फंडही पॅसिव्ह इंडेक्स फंड आहे. आणि त्याचा बेंचमार्क इंडेक्स आहे. अमेरिकेचा NAsdag 100 Index! MSCI World च्या तुलनेत हा मर्यादित इंडेक्स आहे. कारण तो US Stock Exchange वर नोंदणीकृत असणार्‍या सर्वात मोठ्या 100 कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो. परंतु, त्याच्या घटक कंपन्यांमध्ये फायनान्शिअल कंपन्यांचा समावेश नाही. बहुतेक सर्व मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचा मिळून हा इंडेक्स बनलेला आहे. अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन, अल्फाबेट, फेसबुक, टेस्ला, एनव्हीडीया, पेपाल, अडोब या त्याच्या टॉप टेन कंपन्यांकडे नजर टाकली तरी हा फंड किती Technology Heavy आहे, ते दिसून येते.

कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगातील लोकांची जीवनशैली बदलून गेली आहे. ऑफिसचे काम, खरेदी, करमणूक असे सर्व काही Online करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्याचमुळे ज्यांना FAANG Companies म्हणतात. त्या फेसबुक, अल्फाबेट, अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि अ‍ॅपल या कंपन्यांचा प्रचंड विस्तार झाला आहे. इतका की मागील 5 वर्षांत Nasdag 100 TRI या इंडेक्सने 34.6% वार्षिक सरासरी परतावा दिला आहे. तर याच काळात आपल्या निफ्टी 50 ने 18.8% वार्षिक सरासरी परतावा दिला आहे.

ग्लोबल किंवा इंटरनॅशनल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे काही निश्चित फायदे आहेत. देशाबाहेरील कंपन्यांमध्ये गुंतवणूक आणि तीदेखील विकसित देशांमधील टॉप कंपन्यांमध्ये केली, तर त्याचा लाभ हा निश्चितपणे होणार. कारण अमेरिका, युरोप, कॅनडा अशा अति-विकसित प्रदेशांमधील कंपन्यांची गुणवत्ता उच्च असते. त्यांची नफा-क्षमता अतिशय स्थिर असते. त्यांचे व्यवस्थापन भागधारकांना फायदा मिळवून देणारे असते आणि त्यांची नफा-तोटा पत्रके, ताळेबंद हे अतिशय पारदर्शक असतात. त्यामुळे या विकसित देशांमधील शेअरबाजार भारतीय शेअर बाजाराच्या तुलनेत कमी Volatile असतात. दुसरी गोष्ट म्हणजे विकसित देश हे अधिक Exporter असतात. तर भारतासारखे विकसनशील देश हे अधिक Importer असतात. त्यामुळे Dollar Apprecialion चा आयासे मिळणारा लाभ हा फंडाच्या लाभामध्ये अधिक होऊन गुंतवणूकदारांना जास्तीचा परतावा मिळण्यात त्याची परिणती होते.

आता या फंडामध्ये गुंतवणूक करताना तीन प्रश्न उभे राहतात आणि ते म्हणजे :

1) अशा प्रकारच्या फंडाचे Taxation कसे असते?
2) या दोन्हीपैकी कोणता फंड अधिक चांगला?
3) आज सर्व मार्केटस् All Time High च्या पातळीवर असताना या फंडामध्ये गुंतवणूक करावी काय?

Taxation चा विचार करता, इंटरनॅशनल, ग्लोबल किंवा फंड ऑफ फंड्स हे भारतात Debt फंडाच्या वर्गवारीमध्ये गणले जातात आणि त्यांना Debt फंडाचे टॅक्सेशन लागू होते. म्हणजे तुन्ही तीन वर्षांच्या आत या फंडामधील गुंतवणूक काढली तर त्यावर मिळणारा लाभ हा अल्पकालीन लाभ समजला जातो आणि तुमच्या आयकर स्लॅबनुसार त्यावर कर आकारणी केली जाते. तीन वर्षांनंतरच्या लाभाला दीर्घकालीन लाभ समजले जाते आणि त्यावर 20 टक्के इंडेक्सेशनचा लाभ घेता येतो.

या दोहोंपैकी कोणता फंड अधिक चांगला? तर HDFC Developed World Indexes Fund हा अधिक व्यापक स्वरूपाचा फंड आहे. कारण तो 23 विकसित देशांमधील 1583 कंपन्यांचा प्रातिनिधिक इंडेक्स असणार्‍या MSCI World या इंडेक्सला Track करतो, तर ICICI Pru NAsdag 100 हा मर्यादित इंडेक्सला (कंपन्यांच्या संख्येनेही आणि त्यांच्या स्वरूपानेही) Track करतो.

तिसरा प्रश्न म्हणजे ही वेळ अशा फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आज तरी सर्व शेअर बाजार उच्च पातळीवर असले तरी बाजारामध्ये एंट्री करण्याचे अचूक Timeing भल्या भल्या अर्थतज्ज्ञांनाही जमत नाही. त्यामुळे बाजार कोसळण्याची वाट पाहणे हा एक निरर्थक उद्योग आहे. त्यापेक्षा ज्याला Staggered Investment म्हणतात (टप्प्याटप्प्याने गुंतवणूक) तशी करावी आणि ती कधीही करावी. SIP किंवा STP हे दोन अतिशय सुंदर पर्याय त्यासाठी आहेत. गुंतवणूकदारांना आर्थिक शिस्त लावणारे आणि दीर्घकाळात हमखास भरघोस लाभ मिळवून देणारे हे दोन मार्ग आहेत. त्यांचा वापर करून अशा ग्लोबल इंडेक्स फंडामध्ये आवश्यक गुंतवणूक करावी.

Back to top button