राजस्थान : दलबदलू नेत्यांचा आमदारकी वाचविण्यासाठी आटापिटा | पुढारी

राजस्थान : दलबदलू नेत्यांचा आमदारकी वाचविण्यासाठी आटापिटा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राजस्थान  मधील बहुजन समाजवादी पार्टीच्या सहा आमदारांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून, न्यायालयाने राजस्थान  मधील संबंधित आमदारांना आपले अंतिम उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आमदारकी वाचविण्यासाठी सहापैकी चार आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला आहे.

बसपाच्या राजेंद्र गुढा, वाजिब अली, संदीप यादव आणि लाखण मीणा, दीपचंद खैरिया तसेच जोगिंदरसिंग अवाना या आमदारांनी बसपाला खिंडार पाडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते.

पक्ष बदल कायद्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने वरील आमदारांना अंतिम उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

आमदारकी वाचविण्यासाठी कायदेशीर उपाय शोधण्याची या आमदारांची धडपड सुरु आहे.

खैरिया आणि अवाना वगळता इतर चार आमदारांनी यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, बसपाच्या मायावती अथवा भाजपचे अमित शहा यापैकी जो कोणी आसरा देईल, त्यांची आम्ही भेट घेऊ, असे या आमदारांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले.

तिकडे जयपूरमध्ये खैरिया आणि अवाना यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट घेतली आहे.

हेही वाचलं का? 

 

 

 

 

Back to top button