पंचाळेश्वरसह राक्षसभुवनला पूराचा वेढा, आत्मतीर्थ दत्त मंदिर पाण्याखाली | पुढारी

पंचाळेश्वरसह राक्षसभुवनला पूराचा वेढा, आत्मतीर्थ दत्त मंदिर पाण्याखाली

गेवराई; पुढारी वृत्तसेवा: गेवराई तालुक्यातील पंचाळेश्‍वर, राक्षसभुवन, खामगा, आगुरनादर आदी गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. यात आत्मतीर्थ दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले आहे.

जायकवाडी नाथ सागरातून २७ दरवाजे उघडण्‍यात आले असून  ८९०४०४ क्युसेस पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील गोदावरीच्या काठावरील गावात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे.

गेवराई तालुक्यातील श्री. दत्तात्रय भोजन स्थान, आत्मतीर्थ दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले असून श्री. क्षेत्र शनी राक्षसभुवन गावाला  पाण्याचा वेढा पडला आहे.नदी परिसरातील रहिवाशाना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले आहे.

गेवराई तालुक्यातील सुरळेगाव, पंचाळेक्ष्वर, राक्षसभुवन, खामगा, आगुरनादर, संगम जळगाव, राजापुर आदी गावात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. यामुळे येथे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. येथे एनडीआरएफची टीम तैनात केली आहे.

नाथसागरातून विसर्ग वाढविण्यात आल्यास गावकऱ्यांना सुरक्षित ठिकणी हालविण्‍यात आले आहे,  असे प्रशासनाने सांगितले. याच दरम्यान हवामान खात्याने उद्या महाराष्ट्रात हाय आलर्ट जारी केला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचलंत का?

पाहा व्हिडिओ : #UPSCResult : ऑडिओ ऐकून केला अभ्यास | अल्पदृष्टी असणारा आनंद पाटील देशात 325 वा

Back to top button