पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मंगळवारी ही भेट होणार होती. गेल्या काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असून त्याची परिणिती कॅप्टन सिंग यांच्या पक्ष सोडण्यात होते की काय अशी अटकळ बांधली जात आहे.
अमरिंदर सिंग यांना केंद्रात केंद्रीय कृषीमंत्रिपदाची ऑफर दिल्याचे समजते.
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा आहेत.
राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन सिंग यांनी पक्षावर टीका केली होती. तसेच नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावरही पाकिस्तानशी संबध असल्याची टीका केली होती.
आपल्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे कॅप्टन सिंग यांनी सांगितले होते.
मात्र, ते अकाली दलात जातात की, स्वत:चा पक्ष काढतात याकडे लक्ष लागले होते.
मात्र, सोमवारी ते सिंग यांची भेट घेणार होते. ती भेट एक दिवस पुढे ढकलली.
आज सायंकाळी सहा वाजता ते अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात रंगली आहे.
पंजाबमध्ये कृषी कायद्यांवरून भाजपविरोधात वातावरण आहे.
त्यामुळे तो रोष कमी करण्यासाठी अमरिंदर सिंग जर भाजपात दाखल झाले तर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करायचे.
त्यांच्याकडे केंद्रीय कृषीमंत्रिपद द्यायचे अशी खेळी भाजप खेळू शकते.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अमरिंदर सिंग हे भाजपच्या फायद्यात पडून शकतात, अशाही चर्चा आहेत.
पंजाबमध्ये अमरिंदर सिंग हे भाजपचा चेहरा असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते विधानसभा निवडणूक लढवतील असे बोलले जात आहे. अमरिंदर सिंग – अमित शहा भेट हा त्यामागचा भाग असल्याचे बाोलले जात आहे.
अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यासाठी काँग्रेस पक्षातून प्रचंड दबाव होता. हायकमांडने तीन वेळा त्यांना दिल्लीला बोलावून घेतले.
सिद्धू यांचे पारडे जड झाल्याने त्यांना अखेर पद सोडावे लागले. या पदावर अमरिंदर यांच्य नीकटवर्तीयाची वर्णी लागेल असे वाटत होते.
मात्र, तसे झाले नाही. सिद्धू यांचे पारडे जड असले तरीही पक्षान सिद्धू यांचेही पंख कापल्याने सिद्धूनेही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा :