

अखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतले आहे. २८ सप्टेंबरच्या अतिवृष्टीने नदीकाठची वाहून गेले आहेत. तर शेतातील उभ्या सोयाबीन पिकात पाणी साचले आहे.
या परिसरात यावर्षी सोयाबीनचा पेरा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केला होता. पण, अतिवृष्टीमुळे अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या व इतर पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे काढणीला आलेले पीक वाया गेली. जागेवरच शेंगांना कोंब फुटले आहेत.
नदीकाठच्या ओढ्याकाठच्या शेतामध्ये पाणी शिरले आहे. सोयाबीनच्या लावलेल्या गंजा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या सहा ते सात वर्षांनंतर सर्वात मोठी अतिवृष्टी झाली. नदी-नाल्यांनी धोक्याच्या पातळी ओलांडल्या. अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी गेले. पण, उभी पिके आडवी झाली. हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनला कोंब फुटलेत. पीक वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
आखाडा बाळापूर जवळ कयाधू नदीला सात वर्षानंतर महापूर आला होता. या पुरामध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत. तहसीलतर्फे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.