निर्देशांक : आर्थिक व्यवस्था सुधारण्याची संधी! | पुढारी

निर्देशांक : आर्थिक व्यवस्था सुधारण्याची संधी!

डॉ. वसंत पटवर्धन

मागील आठवड्यापासून बाजारात सतत सकारात्मकच भावना होती. त्यामुळे निर्देशांक व निफ्टी सतत वधारतच राहिले. गेल्या गुरुवारी बाजार बंध होताना निर्देशांक 59,141 वर बंद झाला तर निफ्टी 17,629 वर स्थिरावला होता. गेल्या गुरुवारी निर्देशांक बाजार बंद होताना 59,885 वर स्थिरावला तर निफ्टीने 17,822 चा उच्चांक गाठला होताना बाजाराचा हा कल लक्षात घेतल्यानंतर निर्देशांक नजीकच्या भविष्यात 62 हजारांपर्यंत गेला आणि निफ्टी ने 20000 च्या रेषेला स्पर्श केला, तर नवल वाटणार नाही. त्यामुळे निवेशकांनो, गुंतवणूक करण्याचे थांबू नका. नाहीतर थांबला तो संपला या उक्तीचा अनुभव पदरात पडेल.

गेल्या गुरुवारी काही शेअर्सचे भाव खालीलप्रमाणे होते. हेग 2238 रुपये, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 284 रुपये, मन्नापुरम फायनान्स 174 रुपये, जिंदाल स्टील 371 रुपये, मुथुट फायनान्स 1519 रुपये, केइआय इंडस्ट्रीज 899 रुपये, लार्सेन अँड टुब्रो 1770 रुपये, लार्सेन अँड टुब्रो इन्फोटेक 6036 रुपये, स्टेट बँक ऑफ इंडिया 449 रुपये, स्टील स्ट्रीप्स 1733 रुपये, पीएनबी हाऊसिंग 670 रुपये, बजाज फिनसर्व्ह 18503 रुपये, पिरामल एन्टरप्राइसेस 2779 रुपये.

यातील बर्‍याचशा शेअर्सचा ‘चकाकता हिरा’ या परिच्छेदातून आढावा घेतला आहे.
मोटारींच्या कंपन्यांचे शेअर्सवर गेल्यामुळे निर्देशांक सुधारण्याला त्याची मदत होत आहे.

महाराष्ट्र राज्याला कोरोना काळात मोठा फटका बसूनही औद्योगिक गुंतवणूक इथेच जोमाने वाढत आहे. कारण इथे वीज व पाण्याचा पुरवठा वाढत आहे. तसेच पायाभूत संरचनाही मजबूत आहे, त्याचाच एक परिणाम म्हणून ‘जे एस डब्ल्यू’ कंपनीने महाराष्ट्र राज्य शासनाबरोबर सुमारे 35,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. या करारानुसार ‘जे एस डब्ल्यू’ कंपनी जलविद्युत आणि पवन ऊर्जा क्षेत्रात काम करेल. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील ‘भिवली’ धरणावर सुमारे दीड हजार मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प पुढील काही वर्षात उभा राहील.

वस्तुसेवाकराच्या बाबतच्या समितीची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. या कराचे केंद्र सरकारला चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यात पेट्रोल व डिझेलवर हा कर आणायचा की नाही, यावर अजून निश्चितता झालेली नाही. ब्रेंट क्रूडचे दर मागील आठवड्यात थोडे वाढले, कारण तो दर प्रती बॅरल 75 डॉलरच्या पातळीवर गेल्यामुळे आपल्याकडील इंधनाचे दर आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईतही थोडी वाढ होईल.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन यांच्याकडे द्रवता जास्त असल्यामुळे (एचडीएफसी) गृहकर्जे स्वस्त करण्याचे ठरवले आहे. यापूर्वीही स्टेट बँकेने गृहकर्जावरील व्याजदर घटवलेले आहेत. एचडीएफसी व स्टेट बँक यांच्याकडील कर्जे आता पात्रता असलेल्या कर्जदारांसाठी 6.7 टक्के दराने मिळणार आहेत. नजीकच्या भविष्यात दसार दिवाळीसारख्या सणासुदीचे दिवस सुरू होत असल्यामुळे या कर्जांना चांगली मागणी यांनी त्यांच्या प्रमाणेच पंजाब नॅशनल बँक व बँक ऑफ बडोदा यांनीसुद्धा गृहकर्जे स्वस्त केली आहेत.

गुरुवारी 23 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिकेच्या दौर्‍यात तिथल्या पाच मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांशी संवाद साधला, आणि त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी यासाठी आर्जवपूर्वक आमंत्रण दिले. कोरोनाची साथ असूनही भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचे त्यांना सांगितले. या बैठकीत ड्रोन उत्पादन, फाईव्ह जी तंत्रज्ञान, सेमी कंडक्टर उत्पादन, सौर ऊर्जा हे विषय प्रामुक्याने चर्चेला घेतले गेले होते. भारतात ड्रोनचे उत्पादन सुरू झाल्यास चीन व पाकिस्तानच्या कारवार्‍यांना आळा बसेल.

बँकांच्या अनार्जित कर्जांचा बोजा उतरवण्यासाठी, एक बॅड बँक स्थापन करून तिच्याकडे ही कर्जे हस्तांतरित होतील. बँक बँक स्थापनेमुळे बँकांचा अडलेला श्वास मोकळा होईल, त्यासाठी केंद्रसरकारला 30 हजार रुपयांची हमी घेईल. भारताची आर्थिक व्यवस्था आधिक सुधारण्यासाठी खालील उपाययोजना केल्या आहेत.

अमेरिका व भारतातील शेअर बाजारावर दोन्ही देशातील गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवलेला आहे. कोरोनाचे संकट आता निवळत चालले आहे. कारण कित्येक कोटी लोकांचे लसीकर वेगाने केले जात आहे. पावसाळाही आतापर्यंत समाधानकारक झाला आहे.

Back to top button