Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, खरेदीची हीच सुवर्णसंधी! | पुढारी

Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, खरेदीची हीच सुवर्णसंधी!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे. सोने (Gold Rate) प्रति तोळा ४६ हजार रुपयांवर आले आहे. गुरुवारी (दि.२३ सप्टेंबर) सोन्याचा प्रति तोळा (१० ग्रॅम) दर ४६,६९४ रुपयांवर होता. हा दर शुक्रवारी (दि.२४ सप्टेंबर) ४२० रुपयांनी कमी होऊन ४६,२७४ रुपयांवर आला. तर चांदीचा दर प्रति किलो ६०,४१० रुपये होता.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Rate शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,२७४ रुपये, २३ कॅरेट सोने ४६,०८९ रुपये, २२ कॅरेट सोने ४२,३८७ रुपये, १८ कॅरेट ३५,१२० रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,३९३ रुपये होता.

मागील एक वर्षातील सोन्याच्या किमतीवर नजर टाकल्यास गेल्या वर्षी २०२० मध्ये सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ५६,१९१ रुपयांवर पोहोचला होता. तर सप्टेंबर २०२१ मध्ये सोने ४६ रुपयांपर्यंत खाली आले. सध्याचा दर हा गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी आहे.

डॉलर इंडेक्स एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

Gold Price Today

दरम्यान, सणासुदीच्या काळातच सोन्याचे दर खाली आल्याने सोने खरेदीची सुवर्णसंधी असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोने सहा आठवड्याच्या निच्चांकी स्तरावर आले आहे. एमसीएक्सवर सोने ४६ हजारांवर व्यवहार करत आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.

दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : बासरीची धून गुंजतेय बावधनच्या टेकडीवर |The story of flute player

Back to top button