साडी नेसल्याने रेस्‍टाॅरंटमध्‍ये प्रवेश नाकारला; महिलेने सुरू केली साडीमोहीम | पुढारी

साडी नेसल्याने रेस्‍टाॅरंटमध्‍ये प्रवेश नाकारला; महिलेने सुरू केली साडीमोहीम

पुढारी ऑनलाईन डेस्क : साडी नेसून आल्याने महिलेला दिल्लीतील एका नामांकित रेस्‍टाॅरंटमध्‍ये प्रवेश नाकारला. तिने केवळ भारतीय पेहराव केला म्हणून रेस्‍टाॅरंटमध्‍ये प्रवेश नाकारला या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय या प्रकाराचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

दिल्लीमधील ऑगस्ट क्रांती मार्ग येथे अ‍ॅक्वीला रेस्‍टाॅरंट आहे.

संबधित महिला येथे गेली. कर्मचाऱ्यांनी तिला अडवत हा स्मार्ट कॅज्युअल ड्रेस नाही, असे सांगत प्रवेश नाकारला.

यावेळी संबधित महिलने ड्रेसकोडबाबत विचारणा केली. तसेच नियम दाखवा असे विचारले मात्र, कर्मचाऱ्यांनी तिला जुमानले नाही.

संबधित महिलेने आता या रेस्‍टाॅरंटविरोधात साडीमोहीम सुरू केली आहे.

सोशल नेटवर्किंगवर १६ सेकंदांची एक क्लिप व्हायरल झाली असून, त्यात संबधित महिला ड्रेसकोडबाबत विचारणा करत आहे.

‘साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही असं कुठे लिहिले आहे, हे दाखवा.’असेही ही महिला विचारते.

महिलेने हा प्रश्न विचारल्यानंतर ‘मॅडम, आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल कंपड्यांमध्ये असणाऱ्यांना प्रवेश देतो.

साडी हा स्मार्ट कॅज्युअल प्रकार नाही,’ असे सांगून रेस्‍टाॅरंट कर्मचारी निघून जाते.

अनिता चौधरी या महिलेने हा व्हिडिओ शेअर केलाय. त्यात त्या म्हणतात, ‘अ‍ॅक्वीला रेस्‍टाॅरंटमध्ये साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही कारण भारतीय साडी ही स्मार्ट कपड्यांमध्ये येत नाही.

स्मार्ट कपडे म्हणजे काय?

स्मार्ट कपडे म्हणजे काय याची काही ठोस व्याख्या असेल तर मला सांगा, असे त्‍यांनी म्‍हटलं आहे.

मला स्मार्ट कपडे काय असतं ते सांगा म्हणजे मी साडी नेसणं बंद करेन,’ अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडिओखाली लिहिली आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पेहरावावरून भेदभाव कसा केला जातो? असा सवालही उपस्थित केला आहे.

अनेकांनी आम्ही साडी नेसून अमेरिका आणि अन्य देशांमध्ये गेलोय पण आम्हाला कुणी अडविले नाही.

भारताच्या राजधानीत जर असा प्रकार घडत असेल तर ते धक्कादायक आणि संताप आणणारे आहे, असे म्हटले आहे.

रेस्‍टाॅरंटमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर देशपातळीवर सर्व माध्यमांनी दखल घेतली आहे. सबधित महिलेने पंतप्रधान नरेद्र मोदी आणि शिवसेनेला ट्विट टॅग केले आहे.

हेही वाचलंय का ? 

 

Back to top button