नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी? उत्तर प्रदेश सरकारची शिफारस - पुढारी

नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी? उत्तर प्रदेश सरकारची शिफारस

लखनौ, पुढारी ऑनलाईन : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणी संतांकडून सतत सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती. अखेर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस बुधवारी रात्री केली.

दोन दिवसांपूर्वी नरेंद्र गिरी यांचा मृतदेह वाघंबरी मठात संशयास्पदरित्या आढळून आला होता.

त्यांच्या खोलीत सुसाईड नोटही लिहिली होती. यात प्रमुख शिष्य आनंद गिरी यांचा उल्लेख होता.

त्यावरून त्यांना अटकही केली आहे. तसेच त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बलवीर गिरी यांना उत्तराधिकारी घोषित केले आहे.

नरेंद्र गिरी यांचे शवविच्छेदन झाल्यनांतर त्यांना मठात भूसमाधी दिली. यावेळी माध्यमांना लांब ठेवण्यात आले.

मृत्यूप्रकरणी अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनच्या संयुक्त सचिवांनी याचिका दाखल केली आहे.

काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अन्य पक्षांनी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणी दबाव वाढत गेल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

तसे ट्विट केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.

गुरु-शिष्यांत वाद

भाजपचे खासदार चिन्मयानंद यांनी याप्रकरणी शिष्य आनंद गिरी यांच्यावर आरोप केला आहे. ‘नरेंद्र गिरी हे आत्महत्या करू शकत नाहीत.

नरेंद्र गिरी हे एका राजकीय पक्षातील नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांनी वाघंबरी आखाड्याची काही संपत्ती विकली होती.

त्यांचे शिष्य आनंद गिरी यांनी पैशांच्या व्यवहारावरून प्रश्न उपस्थित केले होते. यावरून गुरु-शिष्यात वाद होता.

ज्यांच्याकडे नरेंद्र गिरी यांचा पैसा होता, हा त्यांचाच कट आहे, असा आरोप चिन्मयानंद यांनी केला आहे.

हेही वाचा: 

Back to top button