पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घेतला निर्णय | पुढारी

पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घेतला निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक झाली. यात सामान्य लोकांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र, यावेळी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत ठेवण्यात आले नाही. सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणू शकते असं सतत बोलल जात होत.

कोरोनावरील औषधांवर सूट

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, कोरोनाशी संबंधित औषधांवर जीएसटी दर माफ करण्यात आले आहेत, जे ३० सप्टेंबरपर्यंत लागू होतील. आता ही सूट ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएसटी दरामध्ये ही सूट केवळ औषधांमध्ये दिली जाणार असली तरी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये इतर अनेक उपकरणांचाही समावेश होता.

त्यांनी पुढं म्हटलं की, काही जीवन रक्षक औषधे जी खूप महाग आहेत, जी मुलांसाठी जास्त वापरली जातात. हे कोरोनाशी संबंधित नाहीत. अशा औषधांना जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.

आता यावर जीएसटी लागू होणार नाही. अशी दोन महत्वाची औषधे म्हणजे जोलगेन्स्मा आणि विल्टेप्सो या औषधांवर जीएसटी इथून पुढे लागू नसणार. अस अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले आहे.

हेही वाचलत का :

ही गोष्ट चिमुरड्याच्या माध्यमातून भक्तीची नवी भाषा शिकवते

Back to top button