MS Dhoni- Anand mahindra : एम एस धोनी आणि आनंद महिंद्रांना संरक्षण मंत्र्यालयाकडून मोठी जबाबदारी | पुढारी

MS Dhoni- Anand mahindra : एम एस धोनी आणि आनंद महिंद्रांना संरक्षण मंत्र्यालयाकडून मोठी जबाबदारी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : MS Dhoni Anand mahindra : क्रिकेट क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला आता आउट ऑफ फिल्डची जबाबदारी मिळणार आहे. धोनीला नुकतचं भारतीय टी२० वर्ल्ड कपसाठी मेंटॉर करण्यात आले आहे. त्याचबरोबर आता भारत सरकारकडून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. (ms dhoni and anand mahindra gets major responsibility by indian defense ministry)

धोनीबरोबर महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा (MS Dhoni- Anand mahindra) यांच्यासह १५ जणांचा यात समावेश असणार आहे. केंद्रीय संरक्षण खात्याकडून एक कमिटी नेमण्यात आली आहे. यात त्यांचा समावेश आहे.

त्यांच्यासोबत आनंद महिंद्रा, राजवर्धन सिंह राठोड, राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे, अर्थ मंत्रालयातील प्रधान आर्थिक सल्लागार संजीव सान्याल आणि जामिया मिलिया इस्लामियाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांचीही नावे या समितीमध्ये आहेत. ही समिती एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) च्या सर्वसमावेशक पुनरावलोकनासाठी करण्यात आली आहे.

या समितीच्या इतर सदस्यांमध्ये एसएनडीटी महिला विश्वविद्यालयाच्या माजी कुलगुरू वसुधा कामत, भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन सचिव मुकुल कानिटकर, सेवानिवृत्त मेजर जनरल आलोक राज, एसआयएस इंडिया लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक ऋतुराज सिन्हा आणि डेटाबुकचे सीईओ आनंद शाह यांचा समावेश आहे. त्याचबरोबर माजी आमदार बैजयंत पांडा हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

एनसीसीला व्यापक बनवण्यासाठी जबाबदारी

महेंद्रसिंह धोनी भारतीय लष्करात लेफ्टिनंट कर्नल (मानद) पदावर आहे.

दरम्यान संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, एनसीसीला अधिक व्यापक बनवण्यात येणार आहे.

एनसीसी खाकीतील भारतातील मोठं संघठन असलेला विभाग आहे. यातून युवा पिढीमध्ये एकता, अनुशासन आणि धर्मनिरपेक्ष दृष्टीकोण निस्वार्थ सेवा देण्यासाठी एनसीसीमध्ये शिकवले जाते.

एमएस धोनी अजूनही क्रिकेटच्या मैदानापासून पूर्णपणे दूर गेला नाही.

१९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून धोनी दिसणार आहे.

धोनीला ही जबाबदारी मिळाल्यानंतर ‘मी राष्ट्राच्या सेवेत आहे माझी राष्ट्राशी बांधिलकी कायम राहणार आहे.’ असे त्याने म्हटले आहे.

Back to top button