NCRB : जातीय आणि धार्मिक दंगलीचे प्रमाण वाढले, युपीत दोन तासांला एका बलात्काराची नोंद | पुढारी

NCRB : जातीय आणि धार्मिक दंगलीचे प्रमाण वाढले, युपीत दोन तासांला एका बलात्काराची नोंद

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (National Crime Records Bureau) माहितीनुसार २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जातीय किंवा धार्मिक दंगलींच्या प्रकरणांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. (communal or religious riots). २०१९ मध्ये हे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले होते. (communal and religious riots almost doubled in the country in 2020 ncrb)

केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती सादर केली आहे.

२०२० मध्ये देशात जातीय आणि धार्मिक दंगलींची ८५७ प्रकरणे नोंदवली गेल्याचे सांगण्यात आले.

२०१९ मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशा प्रकरणांची संख्या जास्त होती. तर २०१९ एकूण ४३८ प्रकरणे समोर आली होती. हीच संख्या २०१८ मध्ये ५१२ होती.

एनसीआरबीच्या माहितीनुसार (NCRB) कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे २५ मार्च २०२० ते ३१ मै २०२० पर्यंत देशभरात पुर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. याकारणामुळे देशभरात कोणतीही मोर्चे किंवा आंदोलने झाली नव्हती.

परंतू जानेवारी आणि फेब्रुवारी २०२० या महिन्यात याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले. हे प्रमाण देशातील उत्तर भागात अधिक दिसून आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ

उत्तर प्रदेशात प्रत्येक दोन तासाला एक बलात्कार होत असल्याची माहिती समोर आली आहे.

याचबरोबर राज्यात ९० मिनिटांला अल्पवयीन मुलांवरील अन्यायाच्या विरोधात तक्रार होत असल्याचीही एनसीआरबीकडून माहिती देण्यात आली आहे.

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार २०१८ मध्ये उत्तर प्रदेश मध्ये ४३२२ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तसेच राज्यात महिलांविरोधात ५९४४५ गुन्हे नोंद केल्याचे समोर आले आहे.

यामध्ये दिवसाला ६२ तक्रारी दाखल होत असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

हेच प्रमाण २०१७ मध्ये ७ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. २०१७ मध्ये ५६०११ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

Back to top button