DSP HeeraLal Saini Viral Video : राजस्थानच्या डीएसपीचा अश्लिल व्हिडिओ कसा झाला व्हायरल? - पुढारी

DSP HeeraLal Saini Viral Video : राजस्थानच्या डीएसपीचा अश्लिल व्हिडिओ कसा झाला व्हायरल?

जयपूर; पुढारी ऑनलाईन : DSP HeeraLal Saini Viral Video Case अश्लिल व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटक केलेल्या राजस्थान पोलिस सेवेतील डीएसपी हिरालाल सैनी याला कोर्टाने १७ सप्टेंबर पर्यंत पोलिस रिमांड सुनावला. डीएसपी हिरालाल सैनी याचा एका महिला पोलिस कॉन्स्टेबल सोबत स्विमिंग पूलमध्ये अश्लिल कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

ज्यावेळी दोघे स्विमिंग पूलमध्ये होते त्यावेळी त्यांच्यासोबत छोटा मुलगाही होता. या प्रकरणी दोघांविरोधात पोलिसांकडून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी डीएसपी हिरालाल याला अटक झाली. तसेच पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले. महिला पोलिस कॉन्स्टेबलला देखील निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपकडून चौकशी सुरु आहे.

दरम्यान, स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबलच्या आठ वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यासाठी दोघांनी मुलाचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी पंचताराकिंत हॉटेलमधील लग्जरी सूट बूक केला होता. येथे खोलीसोबत खासगी स्विमिंग पूल देखील आहे. त्यात डीएसपी सैनी महिला कॉन्स्टेबल सोबत बर्थ डे सेलिब्रेट करत होता. केक कापल्यानंतर दोघांनी स्विमिंग पूलमध्ये मुलांसमोरच अश्लिल कृत्ये केली. याचा एक व्हिडिओ शूट केला.

आरोपी सैनीने चौकशीदरम्यान (DSP HeeraLal Saini Viral Video Case) पोलिसांना सांगितले आहे की, महिला कॉन्स्टेबलकडे त्यांचे ५० हून अधिक व्हिडिओज आणि फोटो आहेत. भविष्यात आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी ती हे व्हिडिओ बनवत होती.

स्विमिंग पूलमधील व्हिडिओ ती आपल्या मोबाइल फोल्डरमध्ये सेव्ह करत होती. पण चुकीने तो व्हिडिओ व्हॉटसॲप स्टेटसवर गेला. हा व्हिडिओ महिला कॉन्स्टेबलच्या सासरच्या लोकांनी पाहिला. तेथूनच तो व्हायरल झाला.

डीएसपी सैनी आणि महिला कॉन्स्टेबलचे गेल्या ५ वर्षापासून अनैतिक संबंध आहेत. त्यासाठी तिने आपल्या पतीला सोडून दिले आहे. सैनीने हॉटेलची खोली पोलिस ठाण्याच्या प्रभारीमार्फत बूक केली होती. खोली सोबत असलेल्या खासगी स्विमिंग पूलमध्ये दोघांनी अश्लिल कृत्ये केली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

Back to top button