DSP सोबतच्या रंगेलदार video वर महिला कॉन्स्टेबल पहिल्यांदाच बोलली! | पुढारी

DSP सोबतच्या रंगेलदार video वर महिला कॉन्स्टेबल पहिल्यांदाच बोलली!

उदयपूर; पुढारी ऑनलाईन : स्विमिंग पुलमधील रंगेल व्हिडिओमुळे राजस्थानच्या पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. जलतरण तलावातील अश्लील व्हिडिओ हा राजस्थानमधील डीसएसपी हीरालाल सैनी आणि एका महिला कॉन्स्टेबलचा आहे.

या व्हिडिओमध्‍ये हे दाेघे अश्लील चाळे करत असल्याच दिसत आहे. यावेळी महिला कॉन्स्टेबलचा ६ वर्षाचा मुलगा दिसत आहे. या प्रकरणात हीरालाल सैनी यांना अगोदर अटक केली आहे. आता महिला कॉन्स्टेबललाही एसओजीने अटक केली आहे. या महिला कॉन्स्टेबलने त्यांच्या संबंधांवर अनेक खुलासे पोलिसांसमोर केले आहेत.

कॉन्स्टेबलच्या फोनवरुन केला होता व्हिडिओ

१० जुलै रोजी एका लक्झरी रिसॉर्टमध्ये महिला कॉन्स्टेबलच्या मोबाईलवरून हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबल रिसॉर्टमध्ये गेले होते.

१३ जुलै रोजी महिला कॉन्स्टेबलने तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये जलतरण तलावाचे काही फोटो आणि व्हिडिओ टाकले होते. यात त्या महिलेचा ६ वर्षांचा मुलगाही व्हिडिओमध्ये दिसत होता. पण त्यानंतर दुसरा व्हिडिओ समोर आला, ज्यावर लिहिले होते- भाग २. हा व्हिडिओ २ मिनिटे ३८ सेकंदांचा होता.

यामध्ये दोघेही स्विमिंग पूलमध्ये दिसत होते. अश्लील व्हिडिओतील मुलाची दखल घेत राज्य बाल संरक्षण आयोगाने कारवाईची मागणी केली होती.

मागील ५ वर्षापासून अफेअर

महिला कॉन्स्टेबलला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान महिला कॉन्स्टेबलने सांगितले की, डीएसपी आणि त्यांचे गेल्या पाच वर्षांपासून अफेअर होते. दोघे २०१६ मध्ये अजमेरमध्ये भेटले आणि तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, छोट्या मुलामुळे महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यास अडचणी येत होत्या. त्यानंतर एसओजीने महिला कॉन्स्टेबलची समजूत काढली. यानंतर तिला अटक  करण्‍यात आली हाेती.

१७ सप्टेंबरपर्यंत पोलिस काेठडी

एसओजीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिला कॉन्स्टेबल हा व्हिडिओ एका वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करत होती, परंतु चुकून हा व्हिडिओ तिच्या व्हॉट्स ॲप स्टेटसवर पोस्ट केला. तिचे पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी ते पाहिले. त्यानंतर पतीने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केले.

डीएसपी हिरालाल सैनी आणि महिला कॉन्स्टेबलला गैरवर्तनाच्या आरोपावरून आधीच निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. अटकेनंतर डीएसपी १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. आता महिला कॉन्स्टेबललाही अटक केल्यानंतर न्यायालयाने तिला १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात, नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी म्हटले आहे की, (डीएसपी) हिरालाल सैनी यांच्यासह या प्रकरणातील दाेषी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले पाहिजे. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही कडक कारवाई करावी, असे त्‍यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचलंत का ?

कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

Back to top button