UIDAI New Update : आता १८ वर्षावरील नागरिकांचे आधार कार्ड काढताना 'पासपोर्ट'सारखं होणार 'व्हेरिफिकेशन'!

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रौढांसाठी (१८ वर्षावरील ) आधार कार्ड काढणं आता पहिल्यासाऱखी सोपी प्रक्रिया राहीलेली नाही. पासपोर्ट तयार करताना ज्या पद्धतीने व्हेरिफिकेशन होते. वस्तुनिष्ठ माहितीची पडताळणी केली जाते. तसेच व्हेरिफिकेशन आता आधार कार्ड (UIDAI New Update) काढताना होणार आहे. लवकरच युआयडीएआय (UIDAI-Unique Identification Authority of India) हा बदल करणार आहे.
भारत सरकारकडून नागरिकत्वाचा महत्त्वाचा पुरावा म्हणून आधार कार्डची निर्मिती केली.भारतीय विशिष्ट ओळख प्राधीकरण (UIDAI) द्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेला 12-अंकी ओळख क्रमांक. आधार कार्ड हे प्रत्येक कार्यालयीन कामासाठी आवश्यक असं महत्त्वाचे ओळखपत्र आहे. बँकिंग ते डिजिटल व्यवहारांपर्यंत प्रत्येक व्यवसायासाठी आधार कार्ड आवश्यक असतं.
आता ‘युआयडीएआय’ने नवे आधार कार्ड तयार करण्यासाठी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल प्रौढ म्हणजे १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी आहे. पासपोर्ट तयार करताना ज्या पद्धतीने कागदपत्रांची तपासणी केली जाते. सत्यता तपासली जाते. तसेच व्हेरिफिकेशन आता आधार कार्ड काढताना होणार आहे.
UIDAI New Update : राज्यस्तरावर अधिकारी
युआयडीएआयचे (UIDAI) उपमहासंचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यस्तरावर एक अधिकारी नेमला जाईल. १८ वर्षावरील व्यक्ती आधार कार्डसाठी अर्ज करेल तेव्हा तो अर्ज राज्य स्तरावरील अधिकारी यांच्याकडे जाईल. त्यानंतर तो अर्ज जिल्हा स्तरीय नेमलेल्या अधिकाऱ्याकडे वर्ग केला जाईल. पुढे तालुकास्तरावर अर्जाचे दावे योग्य आढळल्यास आधार बनविण्याची प्रक्रिया सुरू होईल. १८ वर्षावरील नागरिकांसाठी आधार कार्डसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केलं जात आहे. ‘युआयडीएआई’नुसार हे पोर्टल जवळपास तयार झालं असून, आता लवकरची याची अंमलबजावणी होणार आहे.
#Recruitment #UIDAI is looking for passionate professionals for the position of Senior Analyst at UIDAI, Delhi (HQ) to strengthen its team.
Please read the job description in detail before applying.
UIDAI is an equal-opportunity employer. pic.twitter.com/H0ZFmqefah— Aadhaar (@UIDAI) November 16, 2022
हेही वाचा
- मोशी : ‘आधार कार्ड इतरांकडे सोपवू नयेत’
- सोलापूर : बालकांचे आधार कार्ड काढणे झाले सोपे
- स्मार्ट आधार कार्ड अवैध; मूळ आधार कार्ड कसे मिळवाल? जाणून घ्या अधिक
- Aadhar Card : तुमचे आधार कार्ड व्हेरिफाईड नसेल तर ‘या’ आहेत ८ सोप्या पद्धती
- मोबाईलमध्ये आधार कार्ड डाऊनलोड करून ते open कसे करावे ? स्टेप बाय स्टेप समजून घ्या
- Aadhaar Card : आधार कार्डच्या छायांकित प्रतीचा होऊ शकतो गैरवापर : केंद्र सरकारचा नागरिकांना इशारा