मोबाईलमध्ये आधार कार्ड डाऊनलोड करून ते open कसे करावे ? स्टेप बाय स्टेप समजून घ्या | पुढारी

मोबाईलमध्ये आधार कार्ड डाऊनलोड करून ते open कसे करावे ? स्टेप बाय स्टेप समजून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क

आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे आणि ते जवळपास सर्वच सरकारी कामात वापरले जाते. आधार कार्डची हार्ड कॉपी सर्वत्र नेणे शक्य नाही. तथापि, आम्ही स्मार्टफोनमध्ये आधार कार्डची सॉफ्ट कॉपी नक्कीच ठेवू शकतो. (आधार कार्ड डाऊनलोड)

अशा परिस्थितीत आता प्रश्न पडतो की आधार कार्डची सॉफ्ट कॉपी कशी डाउनलोड करायची, तर या बातमीत उत्तर मिळेल. आम्ही तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमध्ये आधार कार्डची सॉफ्ट कॉपी डाउनलोड करू शकाल.

आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सोपा मार्ग

  • आधार कार्ड मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यासाठी UIDAI च्या वेबसाईटला भेट द्या
  • My Aadhaar मेनूवर Download Aadhaar ऑप्शन टॅप करा
  • येथे तुम्हाला आधार, एनरोलमेंट आयडी आणि व्हर्च्युअल आयडी पर्याय मिळतील
  • या तीन पर्यायांमधून, आधार पर्याय निवडा आणि १२ अंकी आधार कार्ड क्रमांक एंटर करा
  • हे केल्यानंतर, व्हेरिफिकेशनसाठी कॅप्चा कोड एंटर करा आणि OTP पर्यायावर टॅप करा.
  • आता OTP एंटर करा
  • यानंतर Verify and Download ऑप्शनवर टॅप करा
  • या प्रक्रियेअंतर्गत तुम्ही मोबाईलमध्ये आधार कार्ड डाउनलोड करू शकाल

ई-आधार कार्डची फाईल लॉक असते. ते उघडण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे. हा पासवर्ड तुमच्या नावाचे पहिले चार शब्द आणि जन्म वर्ष आहे.

आधार क्रमांक किंवा नावनोंदणी नाही तर हे काम करा

तुमच्याकडे आधार कार्ड क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे नाव आणि जन्मतारीख टाकून ई-आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

हे ही वाचलं का ?

Back to top button