मोशी : ‘आधार कार्ड इतरांकडे सोपवू नयेत’ | पुढारी

मोशी : ‘आधार कार्ड इतरांकडे सोपवू नयेत’

मोशी : पुढारी वृत्तसेवा : मोशीतील नागरिकांचे आधार कार्ड पोस्टाकडून नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्यालयात पोहोच केले जाते. नागरिकांना संपर्क साधून ही जनसंपर्क कार्यालये ते वितरित करत असल्याने मोशी परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आधार कार्ड हे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांकडे दिले जाऊ नये, अशा मागणीचे निवेदन मोशी पोस्ट कार्यालयातील अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मोशी भागातील काही लोकांना अजूनही आधार कार्ड पोस्टामार्फत वेळेवर मिळालेली नाही. त्यांचे महत्वाचे कागदपत्र इतर कोणाकडे सुपूर्द करून पोस्ट आपल्या जबाबदारी झटकू शकत नाही. या पुढे आधार कार्ड हे पोस्टमनमार्फत नागरिकांना घरपोच दिली जावीत.

अन्यथा वरिष्ठ पातळीवर तक्रार करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. याबाबत चिंचवड भारतीय डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी काळूराम पारखी यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की पोस्ट कार्यालयाकडून आधार कार्ड वाटपासाठी इतर कोणाकडे देण्यात आलेले नाहीत.याबाबत अशा घटना आढळून आल्यास संबंधित कर्मचार्‍यावर निश्चित कारवाई करू.

Back to top button