Aadhar Card : तुमचे आधार कार्ड व्हेरिफाईड नसेल तर ‘या’ आहेत ८ सोप्या पद्धती

Aadhar Card : तुमचे आधार कार्ड व्हेरिफाईड नसेल तर ‘या’ आहेत ८ सोप्या पद्धती

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत सरकारकडून नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्डची (Aadhar Card) निर्मिती केली. सध्या आधार कार्डवर आपली सर्वच शासकीय कामे होत असतात. परंतु आपल्या आधार कार्डवर डिजीटल सही आहे का याची खात्री तुम्ही केली आहे का? जर तुमच्या आधार कार्डवर डिजीटल सही असेल तर तुमचे आधार कार्ड परिपुर्ण असेल. पण तुमच्या आधार कार्डवर डिजीटल सही नसेल तर तुम्ही ती करून घेणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही अडथळे येऊ शकतात.

तुम्हाला आधार कार्ड कसे व्हेरिफाय करायचे माहिती नसेल तर काळजी नसावी. आधार कार्ड व्हेरिफाय करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत त्या तुम्ही घरबसल्या ही करू शकता.

Aadhar Card : आधार कार्ड व्हेरिफाय करण्याच्या या आहेत सोप्या पद्घती…

लॅपटॉपवर किंवा पीसीवर Adobe Acrobat इंस्टॉल केलेले नसल्यास, प्रथम Adobe Acrobat Reader DC डाउनलोड करा.

डाउनलोड केलेल्या आधार कार्ड PDF वर राईट क्लिक करा आणि Open With वर जा Adobe Acrobat Reader DC निवडा.

आधार कार्डवर Validity Unknown आणि पिवळ्या रंगाचे प्रश्नचिन्ह असलेले मार्क असेल तर तुमचे आधार कार्ड व्हॅलिड नाही?

या प्रश्नचिन्हावर क्लिक करा आणि नंतर Signature Properties बटणावर क्लिक करा.

याच्या खाली तुम्हाला "Show Signer's Certificate…" नावाचे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.

तर वरून Trust टॅबवर क्लिक करा "Add to Trusted Certificates…" वर क्लिक करा.

त्यानंतर सर्व पर्यायांवर क्लिक करा आणि "okay" म्हणा, जोपर्यंत Signature Properties पुन्हा दिसत नाहीत. यामुळे तुमचे आधार कार्ड व्हेरिफाईड करण्यासाठी सर्व पर्याय निवडा.

Signature Properties पर्यायामध्ये, "Validate Signature" वर क्लिक करा. यानंतर पिवळ्या रंगाचा प्रश्नचिन्ह हिरव्या रंगाच्या बरोबर खुन केलेल्या चिन्हात दिसेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news