Aadhaar Card : आधार कार्डच्या छायांकित प्रतीचा होऊ शकतो गैरवापर : केंद्र सरकारचा नागरिकांना इशारा | पुढारी

Aadhaar Card : आधार कार्डच्या छायांकित प्रतीचा होऊ शकतो गैरवापर : केंद्र सरकारचा नागरिकांना इशारा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : आधार कार्डची (Aadhaar card) छायांकित प्रत कोणालाही देऊ नका, कारण त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, असा इशारा केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे. छायांकित प्रत देण्याऐवजी आधारचे केवळ चार क्रमांक असलेली मास्कड (मुखवटा) कॉपी देण्याचा सल्लाही सरकारने नागरिकांना दिला आहे.

आधारकार्ड (Aadhaar card) वापराच्या संदर्भात केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यात कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला आधारकार्डची छायांकित प्रत देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. हॉटेल्स किंवा चित्रपटगृहांना लोकांच्या आधारकार्डची प्रत घेण्याचा अधिकार नसल्याचे इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने आदेशात नमूद केले आहे. लोकांनी आपल्या आधारकार्डचा दुरुपयोग होऊ नये, याकरिता व्यक्ती अथवा संस्थेला आधारकार्डची केवळ मास्कड प्रत द्यावी, मास्कड प्रतीमध्ये आधारचे केवळ चार क्रमांक नोंदविलेले असतात, असेही सांगण्यात आले आहे.

आधारकार्डची प्रत घेण्यासाठी ज्या संस्थांनी भारतीय विशेष ओळख प्रमाणपत्र प्राधिकरणाकडून (यूआयएडीआय) परवाना घेतलेला आहे, अशा संस्थांच लोकांकडून आधारकार्डची प्रत मागू शकतात. आधारकार्ड डाउनलोड करण्यासाठी लोकांनी सार्वजनिक ठिकाणांचा जसे की इंटरनेट कॅफेचा उपयोग करणे टाळावे, असा सल्लाही सरकारने लोकांना दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button