‘ब्रीफ प्रत’ शिवाय वकील म्हणजे बॅटशिवाय सचिन तेंडुलकर : डीवाय चंद्रचूड | पुढारी

'ब्रीफ प्रत' शिवाय वकील म्हणजे बॅटशिवाय सचिन तेंडुलकर : डीवाय चंद्रचूड

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयात एका वकीलाने ब्रीफची कागदपत्रे न घेता आपली बाजू मांडली. यावर भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचे उदाहरण देऊन टिप्पणी केली आहे. एक वकील आपल्या ब्रीफची प्रत न आणता कोर्टात येतो. म्हणजे सचिन तेंडुलकर आपल्या बॅटशिवाय क्रिकेटच्या मैदानात जाण्यासारखा आहे, अशी उपरोधिक टिप्पणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज (दि.१८) केली.

एका वकिलाने कोणत्याही कागदपत्राशिवाय, संक्षिप्त प्रतीशिवाय आपली बाजू मांडताना दिसल्यानंतर चंद्रचूड यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. ब्रीफ नसलेला वकील म्हणजे सचिन तेंडुलकर त्याच्या बॅटशिवाय. तुम्ही तुमच्या गाऊन आणि बँडमध्ये आहात. परंतु कागदपत्र जवळ नाही, हे खूप वाईट दिसते. तुमची ब्रीफ नेहमी तुमच्याकडे असली पाहिजे, असेही चंद्रचूड म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button