Dream Bike : तब्बल ५० हजारांची चिल्लर देऊन घेतली स्वप्नातील बाईक  | पुढारी

Dream Bike : तब्बल ५० हजारांची चिल्लर देऊन घेतली स्वप्नातील बाईक 

पुढारी ऑनलाईन डेस्क :  चिल्लर देऊन आपल्या स्वप्नातील बाईक (Dream Bike) घेतली आहे… हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण असं हटके पद्धतीने आपलं बाईकचं स्वप्न पूर्ण केले आहे आसाममधील एका व्यक्तीने. आणि ही चिल्लर आठ-दहा हजार, अशी नाही तर तब्बल ५० हजारांची आहे. वाचा सविस्तर बातमी.

Dream Bike : गाडी घेण्यासाठी चिल्लर

आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील रामक्रिष्णा नगरमधील एक लघुउद्योजक आहे. सुरंजन रॉयने तब्बल ५० हजारांची चिल्लर देऊन आपली बाईक घेण्याची इच्छा पूर्ण केली आहे. सुरंजनने शनिवारी (दि.२९) रोजी टीव्हीएस शोरूममधून बाईक विकत घेतली.

शोरूमचे कर्मचारी बर्नाली पॉल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की त्यांनी रॉय यांना त्यांच्या इच्छेनुसार “अपाचे 160 4V बाइक” (TVS Apache RTR 160 4V) दाखवली. “बाईक पाहिल्यानंतर, सुरंजनने आम्हाला सांगितले की त्याच्याकडे ₹ ५0,000 नाणी आहेत आणि त्याला डाउनपेमेंट म्हणून रक्कम जमा करून फायनान्समध्ये दुचाकीखरेदी करायची आहे. सुरुवातीला नाण्यांनी भरलेली पोती पाहून सर्वांनाच धक्का बसला, पण नंतर त्यांनी मालकाशी चर्चा केली आणि “बाईक त्या माणसाला देण्याचा निर्णय घेतला”. बाइक खरेदी करण्याच्या एकमेव उद्देशाने त्यांनी नाणी वाचवल्याचे रॉय यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button