बीड : बहिणीच्या लग्‍नाचे कर्ज फेडू तरी कसे? नापिकी अन् कर्जबाजारीपणातून भावाने उचलले टोकाचे पाऊल | पुढारी

बीड : बहिणीच्या लग्‍नाचे कर्ज फेडू तरी कसे? नापिकी अन् कर्जबाजारीपणातून भावाने उचलले टोकाचे पाऊल

केज ; पुढारी वृत्‍तसेवा- सततच्या नापिकीमुळे बहिणीच्या लग्‍नाचे कर्ज आणि वडिलांचे बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून २० वर्षीय भावाने गळफास घेऊन जीवन संपवल्‍याची धक्‍कादायक घटना घडली.

या बाबतची अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील देवगाव ( ता. केज ) येथे रविवारी ( दि. ३१ )दुपारी दीपक बाळासाहेब मुंडे याने घरातील पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन जीवन संपवले. बहिणीच्या लग्नात झालेले कर्ज आणि वडिलांच्या नावे असलेले बँकेत असलेले कर्ज सततच्या नापिकीमुळे फेडता येत नसल्याच्या विवंचनेतून दीपक मुंडे याने हे टोकाचे पाऊल उचलले.

या घटनेची नोंद केज पोलीस ठाण्यात झाली आहे. प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरघाट दूरस्थ पोलिस चौकीचे  हेडकॉन्स्टेबल अभिमान भालेराव तपास करीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button