Indira Gandhi : ज्या भारतासाठी तू प्राणाची आहुती दिलीस, तो भारत…. राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत आठवणींना दिला उजाळा (पाहा व्हिडिओ) | पुढारी

Indira Gandhi : ज्या भारतासाठी तू प्राणाची आहुती दिलीस, तो भारत.... राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत आठवणींना दिला उजाळा (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क :  “आजी, तुझे प्रेम आणि संस्कार दोन्ही माझ्या ह्रदयात आहे. ज्या भारतासाठी तू प्राणाची आहुती दिली आहेस, तो भारत विखरू देणार नाही.” असं ट्विट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपली आजी म्हणजे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

तो भारत विखरू देणार नाही.” 

आज आर्यन लेडी अशी ओळख असणाऱ्या, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची हत्या करण्यात आली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यां आपली आजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या आठवणींनी उजाळा दिला आहे. त्यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की,  “आजी, तुझे प्रेम आणि संस्कार दोन्ही माझ्या ह्रदयात आहे. ज्या भारतासाठी तू प्राणाची आहुती दिली आहेस, तो भारत विखरू देणार नाही.”

भारत जोडो यात्रा 

राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली सात सप्टेंबर पासून भारत जोडो यात्रा सुरु आहे. गेले काही दिवस ही यात्रा चर्चेत आहे. गेले तीन दिवस ही यात्रा दिवाळीनिमित्त स्थगित करण्यात आली होती. तीन दिवसाच्या स्थगितीनतंर राहुल यांनी २७ ऑक्टोबर रोजी तेलंगनामधील नारायणपेठ जिल्ह्यातील मकतालमधून पुन्हा भारत यात्रा सुरु केली आहे.

हेही वाचा

Back to top button