चासकमान धरण पुन्हा भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - पुढारी

चासकमान धरण पुन्हा भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कडूस; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारपासून दमदार पाऊस सुरु आहे. यामुळे ८.५३ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण पुन्हा शंभर टक्के भरले.

चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून शनिवार (दि. ११) रोजी सकाळी ७ वाजता धरणाच्या सांडव्यावरून ९२५ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला.

तसेच विद्युत विमोचकातून ८५० क्युसेक्स विसर्ग सुरू असून त्यापैकी ५७० क्युसेक्स धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे विसर्ग चालू आहे. २८० क्युसेक्स ०/८१० मधील अतिवाहक मधून नदीत सोडण्यात आले आहे. भीमा नदी पात्रात एकुण २८०+९२५ =१२०५ क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

तसेच धरण परिसरात पाऊस वाढल्यास व धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार नदी पात्रात विसर्ग पुन्हा कमी, जास्त करण्याची शक्यता आहे.

यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : बाप्पाचे प्रिय उकडीचे मोदक | Modak Recipe

Back to top button