पीएम मोदी
Latest
पीएम मोदी वाढदिनी ५ कोटी ‘धन्यवाद मोदीजी’ पोस्टकार्ड पाठवली जाणार
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पीएम मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने विशेष तयारी केली जात आहे.
नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबरपासून पुढील तीन आठवड्यापर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन पक्षाकडून करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे पीएम मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरण अभियानात विक्रम प्रस्थापित करण्याचा भाजपचा मानस आहे. ७ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या अभियानादरम्यान १४ कोटी रेशन पिशव्यांचे वाटप, ५ कोटी 'धन्यवाद मोदीजी' पोस्टकार्ड देशभरातील बूथवर पाठवले जाणार असल्याची माहिती भाजप कडून देण्यात आली आहे.
वाढदिवस लसीकरण अभियानाला समर्पित करण्याचा निर्णय
पंतप्रधानांचा वाढदिवस कोरोना विरोधात सुरू असलेल्या लसीकरण अभियानाला समर्पित करण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी १७ सप्टेंबरला पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरण अभियानाला वेग देण्याचे आवाहन केले आहे.
या दिवशी पक्षाकडून प्रत्येक बुथ पातळीवर कार्यकर्ते लोकांना लस देण्यात मदत करतील, असे नड्डाकडून सांगण्यात आले आहे.
नद्यांना स्वच्छ करण्यासाठी ७१ ठिकाणांची ओळख करून याठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाज माध्यमांवर मोहिम राबवण्यासह कोरोना लसीकरण आणि पंतप्रधानांनी आतापर्यंत केलेली कामे, त्यांच्या आयुष्यावर चर्चासत्रांचे आयोजन या दरम्यान करण्यात येणार आहे.
पीएम मोदींना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा लिलाव सुद्धा करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबपर्यंत हे लिलाव केले जातील. कोरोनाची तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता भाजपने लसीकरणासाठी स्वयंसेवकांची मोठी फौज उभी केली आहे.
पक्षाने केवळ ४३ दिवसात ६ लाख ८८ हजार स्वयंसेवक उभे करून एक विक्रम प्रस्थापित करण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
या स्वयंसेवकांच्या मदतीने १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवून नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचा भाजपचा मानस आहे.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त, पक्षाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक दोघेही जास्तीत जास्त लोकांना लसीकरणासाठी घेऊन येणे आणि त्यांना सोयीस्करपणे लस देण्यासाठी एकत्र आणतील. यातून मिळालेली रक्कम नमामि गंगे कार्यक्रमात वापरली जाते.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, डी पुरंदेश्वरी, विनोद सोनकर आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राजकुमार चहर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस आणि सेवा सप्ताह कार्यक्रमासंदर्भात विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
हे ही वाचलं का?

