Lumpy skin disease : ‘लंपी’ जनावरांमधून माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतो? वाचा ICMR चा अभ्यास काय सांगतो? | पुढारी

Lumpy skin disease : 'लंपी' जनावरांमधून माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतो? वाचा ICMR चा अभ्यास काय सांगतो?

पुढारी ऑनलाईन डेस्क :  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR-Indian Council of Medical Research) शास्त्रज्ञ भारतातील 65,000 हून अधिक जनावरे मारणाऱ्या लंपी रोगाच्या विषाणूचा माणसांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता आहे का? याचा अभ्यास करत आहे. यासाठी धोकादायक अशा  लंपी विषाणूची (Lumpy skin disease) लागण झालेल्या जनावरांच्या डोक्याचे नमुने चाचणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. या चाचण्यांमधून हे देखील स्पष्ट होईल की ज्या जनावरांना लंपी आजार झाला आहे त्यांचे दूध सेवन केल्यास संसर्ग होतो का? वाचा सविस्तर बातमी

Lumpy skin disease : आतापर्यंत मानवामध्ये संसर्ग नाही

लंपी (Lumpy skin disease) भारतात आल्यापासून भारतातील 18 राज्यांमध्ये लंपी व्हायरसची 1.5 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पण आतापर्यंत मानवामध्ये संसर्ग झाल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा अजून मिळालेला नाही. गुरु अंगद देव पशुवैद्यकीय  आणि प्राणी विज्ञान विद्यापीठातील तज्ज्ञांनी नुकतचं सांगितले आहे की,  लंपी अशा प्रकारचे गुरेढोरे विषाणूचे मानवाकडून संक्रमण होत नाही,

डॉ. जसबीर सिंग बेदी (सेंटर फॉर वन हेल्थ, संचालक) यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, लंपी विषाणू थेट संपर्काद्वारे किंवा संक्रमित जनावरांचे दूध खाल्ल्याने मानवांना संक्रमित होत नाही. मात्र दूध तुम्ही आहारात घेणार असाल तर ते उकळले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (IVRI-Indian Veterinary Research Institute) सहसंचालक अशोक कुमार मोहंती यांनी पीटीआयला सांगितले की, संक्रमित गुरांचे दूध घेणे सुरक्षित आहे. दूध उकळल्यानंतर किंवा न उकळता असले तरी त्याच्या गुणवत्तेत कोणतीही अडचण येत नाही. बरेली येथील इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI) मधील एका शास्त्रज्ञाने सांगितले की,  वासरू जर लंपी संक्रमित गायीचे कच्चे दूध खात असेल तर त्याला विषाणूची लागण होऊ शकते.

Lumpy skin disease : काय आहे लंपी

लंपी त्वचा रोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे.  ताप येतो. त्यांच्या त्वचेवर गाठी येतात.  हा रोग किटकांपासून पसरतो.  लंपी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button