

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर येत्या काळात विमानांचे लँडिंग करणे शक्य होईल, असा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी केला होता. नितीन गडकरी आता त्यांचा हा दावा प्रत्यक्षात उतरवणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.
भारतीय वायुसेनेच्या एका विमानाने हे लॅन्डिंग होणार आहे. या आठवड्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत गडकरी लॅन्डिंग करणार आहेत. राजस्थानातील बाडमेर येथे बनवण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मॉक आपात्कालीन लॅन्डिंग करणार असल्याचे कळतेय.
दोन्ही मंत्री या आठवड्यात ३.५ किलोमीटर लांबीच्या पट्टीचे उद्घाटन करणार आहेत. वायुसेनेचे युद्ध विमाने तसेच इतर विमानांचे आपात्कालीन लँडिंग करण्यासाठी हा मार्ग तयार केला आहे. अशी माहिती सांगण्यात येत आहे.
वायुसेनेच्या विमानांच्या आपात्कालीन लँडिंगसाठी बनवण्यात आलेला संभवता हा देशातील पहिलाच महामार्ग आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एनएचएआय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले आहे.
बाडमेरमधील राष्ट्रीय महामार्गावर विमानांसाठीची धावपट्टी विकसित करण्यासाठी आयएएफच्या अधिकाऱ्यांसोबत हे काम केले आहे.
वायुसेनेच्या विमानांना आपात्कालीन लँडिंगसाठी धावपट्टी उपलब्ध व्हावी. या उद्देशाने बाडमेर व्यतिरिक्त देशभरात जवळपास १२ राष्ट्रीय महामार्ग तयार केले जात आहेत.
ज्या भागाचा वापर विमानाच्या लॅन्डिंगकरीता केला जावू शकतो. त्यांना चिन्हांकित करीत याअनुषंगाने धावपट्टी तयार होतेय. अशी माहिती समोर आली आहे.
यापूर्वी लखनऊ-आग्रा एक्सप्रसे-वे वर ऑक्टोबर २०१७ मध्ये आयएएफचे युद्ध जेट विमान तसेच प्रवासी विमानाने मॉक लँडिंग करण्यात आली होती.
महामार्गांचा उपयोग आयएएफच्या विमाने आपात्कालीन स्थितीत लँडिंग करण्यासाठी केला जावू शकतो. हे दाखवून देण्यासाठी हे मॉक लँडिंग करण्यात आले होते. लखनयऊ-आग्रा एक्सप्रेस वे उत्तर प्रदेश सरकारच्या अधिनस्थ येतो.
हेही वाचलं का?