

पुढारी ऑनलाईन : 'बिग बॉस ओटीटी' या शोमध्ये 'वीकेंड का वार' मध्ये दोन ग्लॅमरस चेहरे दिसले. हे दोन्ही सुंदर चेहरे बिग बॉस १४ व्या सीझनचा भाग होत्या. त्याचं नाव आहे- निक्की तंबोली आणि रुबीना दिलैक. निक्की तंबोली हिने सुंदर पिंक कलरचा सुंदर ड्रेस घातला होता. तर रुबिना दिलैकने सुंदर राखाडी साडी नेसली होती.
विशेष म्हणजे, निक्कीने जो डार्क पिंक कलरचा ड्रेस घातला होता. तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तिचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्स पुढे सरसावले. पोझ देताना ती वारंवार तिचा ड्रेस वर उडवत होती. तिचा हॉट पिंक पाहून सर्वांच्या नजरा फक्त तिच्यावरचं खिळल्या होत्या.
निक्कीची स्टायलिश अदा पाहून तिचे फोटो पटापट काडण्यासाठी कॅमेरे पुढे आलेय या ड्रेसचा एक भाग अगदी शॉर्ट होता. आणि दुसरा भाग फ्लोअर टच होता. तिची बॉडी फ्लॉन्ट करणारा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निक्कीचा हा ड्रेस खूपच हटके होता.
बिग बॉस शो मध्ये स्टायलिश स्पर्धक म्हणून तिने ओळख मिळवली. तिने 'बिग बॉस१४' मध्ये टॉप ३ मध्ये स्थान मिळवले. ती विजेतेपद मिळवू शकली नाही. पण, बिग बॉसमध्ये तिने आपलं स्थान पक्कं करून प्रेक्षकांच्या मनातही घर केलं.
हॉट डार्क पिंक ड्रेस पाहून सोशल मीडियावर काही युजर्सनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. तर काही नेटकर्यांनी तिला कटू बोल सुनावले आहेत.
पण, तिचा हॉटनेस पाहून तुम्हालाही तिचे कौतुक करण्याचा मोह आवरणार नाही.
हेही वाचलं का ?