Accident : दुचाकीस्वार कोसळला चाळीस फूट खोल दरीत | पुढारी

Accident : दुचाकीस्वार कोसळला चाळीस फूट खोल दरीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भरधाव मिस्कर ग्राईंडरने दिलेल्या धडकेत (Accident) एक दुचाकीस्वार चाळीस फूट खोल दरीत कोसळला. ही घटना सोमवारी (दि.६) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. आलिम मुजावर असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्कर ग्राईंडर सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास कात्रज जुन्या घाटातून पुण्याकडे जात होता. यादरम्यान मिस्कर ग्राईंडरचा ब्रेक निकामी झाल्याने पुढे चाललेल्या दुचाकीस्वारास धडक बसली. यानंतर दुचाकीस्वार तीस ते चाळीस फूट खोल दरीत (Accident) कोसळला.

या घटनेत दुचाकी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सुरक्षा भिंतीला धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे. भारती विद्यापीठ पोलीस आणि कात्रज अग्निशमन केंद्रातील जवान चालक अनंता जागडे, फायरमन रमेश मांगडे, तेजस मांडवकर, शिवदास खुटवड, देवदूत चालक रुपेश जांभळे, फायरमन शुभम शिर्के, निलेश तागुंदे मंदार, राजेंद्र भिलारे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यानंतर दरीतून जखमी दुचाकीस्वारास बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचलंत का? 

पहा व्हिडीओ : 10 मिनिटात बनवा उपवासाचे फराळी पकोडे

हे वाचलंत का? 

Back to top button