सहा ‘आयआयटी’मध्ये ‘डीआरडीओ’चे समन्वयक केंद्र उभारण्यास मंजुरी | पुढारी

सहा 'आयआयटी'मध्ये 'डीआरडीओ'चे समन्वयक केंद्र उभारण्यास मंजुरी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओचा) विस्तार करण्यात येणार असून देशभरातील सहा आयआयटीमध्ये डीआरडीओ आपली समन्वय केंद्र उभारणार आहे. डीआरडीओच्या या प्रस्तावाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूरी दिली असल्याची माहिती डीआरडीओ ने गुरुवारी (दि. १५)  ट्विटर वरून दिली.
डीआरडीओ देशातील सहा आयआयटीमध्ये उद्योग आणि शैक्षणिक समन्वय केंद्र उभारणार आहे. या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली आहे. या समन्वय केंद्रामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या समन्वय केंद्रामुळे डीआरडीओलाही फायदा होणार असून अनेक कौशल्यप्राप्त कर्मचारी मिळतील.
उद्योग आणि शैक्षणिक यामध्ये समन्वय साधून कुशल कर्मचारी तयार करण्याचा प्रयत्न डीआरडीओचा आहे. हैदराबाद, जोधपूर, कानपूर, खरगपूर, रुडकी  आणि बीएचयू या सहा आयआयटी मधे हे केंद्र उभारण्यात येईल. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना डीआरडीओमध्ये आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल.

हेही वाचलंत का?

Back to top button