Gold Prices : सोने पुन्हा स्वस्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव | पुढारी

Gold Prices : सोने पुन्हा स्वस्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारी (दि.३१ ऑगस्ट) सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली. मंगळवारी २४ कॅरेट सोने (Gold Prices) दर ५४ रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७,४२४ रुपयांवर आला. तर चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोने (Gold Prices) ४७,४२४ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,२३४ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,४४० रुपये, १८ कॅरेट ३५,५६८ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,७४३ रुपये होता. तर चांदीचा प्रति किलो भाव ६३,७९७ रुपये होता.

श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी म्हणजे सोमवारी (३० ऑगस्ट) सराफा बाजारात सोने आणि चांदी दरात (Gold Rate Today) तेजी दिसून आली होती. सोमवारी २४ कॅरेट सोने ३९८ रुपयांनी महागले होते. यामुळे (Gold Rate Today) सोने प्रति १० ग्रॅम ४७,५४७ रुपयांवर पोहोचले. तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे ६७२ रुपयांची तेजी दिसून आली होती.

मात्र, मंगळवारी सोन्याच्या दरात किचिंत घसरण दिसून आली.

२४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात.

२४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती?

Back to top button