सेन्‍सेक्‍स ५७ हजार पार, निफ्‍टीचाही नवा विक्रम | पुढारी

सेन्‍सेक्‍स ५७ हजार पार, निफ्‍टीचाही नवा विक्रम

मुंबई;  पुढारी ऑनलाईन: आंतरराष्‍ट्रीय बाजारातील सकारात्‍मकतेचा परिणामामुळे भारतीय शेअर बाजाराने सुरुवातीला विक्रमी पल्‍ला गाठला. सेन्‍सेक्‍स ५७ हजारांच्‍या पार गेला आहे. प्रथमच हा पल्‍ला गाठल्‍याने बाजारापेठेत उत्‍साहाला उधाण आल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. सेन्‍सेक्‍स सोबत निफ्‍टीतही वाढ झाली आहे. सकाळच्‍या सत्रात निफ्‍टीने १७ हजारपर्यंत मजल मारली. ही सर्वात मोठी वाढ आहे.

शेअर बाजाराची सुरुवातच १२७.३७ अकांनी वाधारत ५७ हजारांच्‍या पार गेला. तर निफ्‍टीमध्‍ये ३९.२० अंकांनी वाढ होत १७ हजारांपर्यंत पोहचला.

वाढत्‍या गुंतवणुकीचे सकारात्‍मक परिणाम

बाजारात विदेशी गुंतवणुकीमध्‍ये सातत्‍याचे सकारात्‍मक परिणाम शेअर बाजारावर राहिले आहेत. त्‍याचबरोबर डॉलरच्‍या तुलनेत रुपया भक्‍कम झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम जोमाने सुरु असणे, कोरोना रुग्‍णसंख्‍येत झालेली घट त्‍यामुळे गुंतवणूकदारांमध्‍ये सकारात्‍मक वातावरण आहे. त्‍याचबरोबर जीडीपी आणि वाहन विक्रीमध्‍ये झालेल्‍या वृद्‍धीमुळेही बाजारात सकारात्‍मक परिणाम होत आहे.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button