वाॅशिंग्टन, पुढारी ऑनलाईन : तालिबानने अमेरिकेला (USA) अफगाणिस्तान सोडण्याची ३१ ऑगस्ट ही तारीख दिली होती. या दिवसानंतर अमेरिकेला काबूल विमानतळ सोडण्याचे फर्मान सोडलेले होते. पण, अमेरिकेने एक दिवस आधीच काबूल विमानतळ सोडले आहे. विमान C-17 ने ३० ऑगस्टलाच दुपारी साडेतीन वाजण्यासुमारास विमानतळावरून उडाले.
अफगाणिस्तानमधून अमेरिकेने (USA) आपलं बस्तान हलवलं आहे. काबूलहून जेव्हा हे विमान उड्डाण केलं त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, "अफगाणिस्तानमध्ये आमचे सैन्य २० वर्षं होते. आता ही आमची उपस्थिती संपली आहे. मी आमच्या कंमाडर्सना धन्यवाद देतो. कोणत्याही सामान्य किंवा सामान्य नागरिकाचा मृत्यू होऊ न देता खतकनाक मोहीम संपवली आहे", असं जो बायडेन यांनी सांगितलं.
बायडेन पुढे म्हणाले की, "मागील १७ दिवसांमध्ये आमच्या सैन्याने अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे एअरलिफ्ट केले. आम्ही १.२ लाखांहून अधिक अमेरिक नागरिक, सहकारी देशांचे नागरिक आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढले", अशीही माहिती त्यांनी दिली.
आज दुपारी (मंगळवारी) अमेरिकी नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यात अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला यावर बोलणार आहे. योजनेनुसार तेथून बाहेर पडण्यासाठी एअरलिफ्ट मिशननंतर तेथे उपस्थित असलेल्या आमच्या सर्व कमांडर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सर्वसहमतीने हा निर्णय घेण्यात आला होता.
सध्या अमेरिकेचा दूतावास अमेरिकेने कतारमध्ये स्थलांतरित केला आहे. इतकंच नाही, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हंटलं आहे की, "ज्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडायचा आहे, त्यांना अमेरिकेकडून मदत केली जाईल."
पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले