

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या (Gold Price) दरात चढ-उतार सुरुच आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने विक्रमी स्तरावर म्हणजेच सुमारे ५६ हजार रुपयांवर पोहोचले होते. आता सोने तब्बल सुमारे ९ हजार रुपयांनी खाली आले आहे. यामुळे सोने खरेदीची मोठी संधी आहे.
सराफा बाजारात काल शुक्रवारी (दि.२०) सोन्याच्या दरात काही प्रमाणात तेजी दिसून आली होती. बुधवारच्या तुलनेत शुक्रवारी २४ कॅरेट सोने १३५ रुपयांनी (Gold Price) महागले. यामुळे सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४७,४११ रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले होते.
गेल्या वर्षी सोन्याचा भाव ५६,८०० रुपयांवर पोहोचला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याचा दर तब्बल ९ हजार रुपयांनी कमी आहे. पण सोन्याची मागणी वाढत असल्याने दिवाळी पर्यंत सोन्याचा भाव ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्लेवर्स असोशिएशनने दिलेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७,४११ रुपये (प्रति १० ग्रॅम) होता. तर २३ कॅरेट सोने ४७,२२१ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,४२८ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ३५,५५८ रुपये एवढा आहे.
चांदीचा प्रति किलो भाव ६२,४७१ रुपये एवढा होता.
गेल्या गुरुवारी (दि.१९) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. ही घसरण ०.७ टक्के एवढी होती. यामुळे सोन्याचा दर प्रति औंस १,७७४.४१ डॉलरवर आला. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम).
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातदेखील घसरण झाली होती. ही घसरण १.६ टक्के असून चांदीचा दर प्रति औंस २३.१० डॉलरवर आला होता.
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक वृद्धीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम कमोडिटी मार्केटवर होताना दिसत आहे.
हे ही वाचा :