देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार | पुढारी

देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार

पुढारी ऑनलाइन डेस्क : देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड हे आज शपथ घेणार असून त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपला आहे.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; ६ ऑगस्ट रोजी होणार मतदान

राष्ट्रपती निवडणुकीनंतर 6 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत जगदीप धनखड हे एनडीएचे उमेदवार होते. तर मार्गेरट अल्वा या विरोधी पक्षाकडून निवडणूक लढवत होत्या. निवडणुकीत धनखड यांनी अल्वा यांचा 346 मतांनी पराभव केला.

उपराष्ट्रपतीपदासाठी लोकसभा आणि राज्यसभाचे खासदार मतदान करतात. लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण 788 खासदार आहेत. मात्र राज्यसभेच्या आठ जागा रिक्त असल्याने 780 खासदारांपैकी 725 खासदारांनी मतदान केले. धनकड यांना 528 मते तर अल्वा यांना 182 मते मिळाली. तर 15 मते रद्द करण्यात आली. निवडणुकीसाठी एकूण 92.94 टक्के मतदान झाले.

जगदीप धनखड यांची वैयक्तिक माहिती…

जगदीप धनखड यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण चित्तौड गडच्या सैनिक स्कूलमधून घेतले. ते क्रीडाप्रेमी आहेत. त्यांनी भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. ते ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.

धनखड यांची राजकीय कारकीर्द

मुळचे जनता दल पक्षाचे असलेले जगदीप धनखड हे 1989 च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आले. 1990 मध्ये त्यांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 1991 मध्ये धनखड यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1993 मध्ये ते अजमेरमधील किशनगड येथून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून जुलै 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा:

उपराष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान; जगदीप धनकड आणि मार्गारेट अल्वा यांच्यात थेट मुकाबला

Back to top button