कामाची बातमी: 'मास हिस्टिरिया' म्हणजे नेमकं काय? ज्यामुळे उत्तराखंडच्या शाळेतील मुलींनी अचानक डोकं आपटायला सुरुवात केली | पुढारी

कामाची बातमी: 'मास हिस्टिरिया' म्हणजे नेमकं काय? ज्यामुळे उत्तराखंडच्या शाळेतील मुलींनी अचानक डोकं आपटायला सुरुवात केली

पुढारी ऑनलाईन: काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील एका शाळेतील काही मुले रडत, किंचाळत, जमिनीवर लोळत, डोके आपटत आणि विनाकारण रडत बेशुद्ध झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामध्ये 6 मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. सोशल मीडियावर या घडलेल्या प्रकाराचे वर्णन मास हिस्टिरिया म्हणून केले जात आहे. मास हिस्टेरिया म्हणजे जेव्हा दोन किंवा अधिक लोकांमध्ये समान विचित्र किंवा असामान्य वर्तन, भीतीची भावना किंवा इतर कोणतीही लक्षणे येऊ लागतात.

उत्तराखंडमधील शाळेचा व्हिडिओ समोर आला आहे. तो बागेश्वर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ,माध्यमांतील बातम्यांनुसार शाळेचे नाव रायखोली ज्युनियर हायस्कूल आहे. रडणाऱ्या या मुली आठवीच्या वर्गातल्या असल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर डॉक्टरांचे एक पथक शाळेत पोहोचले. त्यांनी मुलांचे समुपदेशन केले असून त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बागेश्वरचे डेप्युटी चीफ मेडिकल ऑफिसर हरीश पोखरिया यांनी सांगितले की, मुलांशी बोलल्यानंतर असे दिसून आले की, ते आधीच घाबरलेले होते आणि रिकाम्या पोटी शाळेत आले होते. डेप्युटी सीएमओच्या म्हणण्यानुसार एकूण 8 मुलांमध्ये ही समस्या आढळून आली. त्यामध्ये 6 मुली आणि 2 मुले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, गरज भासल्यास या मुलांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले जाईल.

आता उत्तराखंडमधील शाळेतील हे प्रकरण मास हिस्टेरियाचे आहे की नाही, हे सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल. तथापि मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तराखंडमधील अशा मास हिस्टिरियाची प्रकरणे अल्मोडा, पिथौरागढ, चमोली जिल्ह्यांतील शाळांमध्ये यापूर्वीच दिसून आली आहेत.

मास हिस्टिरियामध्ये काय होते?

हेल्थलाइनच्या अहवालानुसार , मास मास हिस्टिरियाची बहुतेक प्रकरणे कोणत्या ना कोणत्या घटनेद्वारे पाहिली आणि ऐकली जातात. लोक इतरांमध्‍ये दिसणार्‍या किंवा ऐकण्‍याच्‍या वर्तन, कृती किंवा लक्षणांप्रमाणेच ते स्वतःही तसेच वागू लागतात किंवा अनुभवू लागतात. काही तज्ञ ‘मास हिस्टेरिया’ हा शब्द वास्तविक नसलेल्या धोक्यासाठी वापरतात, परंतु त्या धोक्याबद्दल लोकांच्या एका गटामध्ये भीती असते.

मास हिस्टिरियाच्या मागे अफवा, कृती, विचार, भीती किंवा धोका यासारख्या गोष्टी असतात. यामध्ये लक्षणे ही खरी असली तरी त्यामागे कोणताही धोका किंवा आरोग्य समस्या नसते. मास हिस्टेरियाची लक्षणे अचानक सुरू होतात आणि संपतात. छातीत दुखणे, सुस्ती, डोकेदुखी, बेशुद्ध होणे, थर थर कापणे, अन अंशिक अर्धांगवायू, हसणे किंवा रडणे या लक्षणांचा समावेश होतो.अनके तपासणी नंतरही त्यात दिसणाऱ्या लक्षणांचे किंवा हालचालींचे कारण कळू शकलेले नाही.

नेपाळमधील शाळेतील मुलांचे रडणे आणि ओरडणे

मास मास हिस्टिरियाच्या अनेक घटनांमध्ये लोकांचे अचानक ओरडणे, रडणे आणि मूर्च्छित होणे अशा घटनांची नोंद आहे. असेच प्रकरण नेपाळमधील एका शाळेत 2018 साली घडले होते. नेपाळमधील पुथान जिल्ह्यातील एका शाळेत ९ वर्षांची मुलगी रडू लागली आणि ओरडू लागली, हे पाहून इतर मुलेही रडू लागली आणि ओरडू लागली. त्या दिवशी शाळेत 47 मुले रडताना आणि किंचाळताना आढळली. सन 2016 आणि 2017 मध्ये एकाच शाळेत एकाच दिवशी अनेक मुलांमध्ये समान वर्तन किंवा लक्षणे दिसून आली. मास हिस्टिरियाची पुनरावृत्ती होण्याचे हे एक अद्वितीय प्रकरण मानले जाते.

याशिवाय मंकीमॅनच्या अफवेने राजधानी दिल्लीत मे 2001 मध्ये मास हिस्टेरियाचे रूप धारण केले होते. सूर्यास्तानंतर लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले होते. मंकीमॅनने त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा अनेकांनी केला. यामध्ये घाबरून पळत असताना छतावरून पडून तीन जणांचा मृत्यू झाला. काही लोकांच्या शरीरावर नखे आणि दातांच्या खुणा आढळल्या. त्यावेळी पोलिसांनाही काही सुगावा लागला नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी मंकीमॅन ही केवळ अफवा असल्याचे सांगितले होते. नंतरच्या अभ्यासात हे प्रकरण मास हिस्टिरिया असल्याचे दिसून आले.

मास हिस्टिरियाचे कारण काय आहे?

मास हिस्टेरियाच्या कारणाविषयी बोलायचे झाले तर त्याविषयी नेमकी आणि खात्रीशीर कारणे अद्याप कळलेली नाहीत. मास हिस्टिरियामध्ये काही गोष्टी दिसून आले आहेत. यामध्ये खूप तणाव, चिंता, सामाजिक दबाव, आघात यांचा समावेश होतो.

मास हिस्टिरियाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जेव्हा अनेक लोक विचित्रपणे वागतात किंवा समान लक्षणे अनुभवत असतात, तेव्हा परिस्थितीचे मूल्यांकन करणे आणि ते कशामुळे होत आहे हे निर्धारित करणे महत्वाचे आहे. जर हे मास हिस्टेरियाचे प्रकरण असेल, तर त्याची लक्षणे कमी करण्याचे मार्ग स्वीकारणे आणि थेरपिस्टला भेटणे हे मदत करू शकते.

Back to top button