ऑगस्टमध्ये बँका अठरा दिवस बंद | पुढारी

ऑगस्टमध्ये बँका अठरा दिवस बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : चालू महिन्यात (ऑगस्ट) रविवार आणि सुट्टीचे दिवस धरून तब्बल अठरा दिवस देशाच्या विविध भागांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

7 ऑगस्ट रोजी रविवार असून त्या दिवशी नेहमीप्रमाणे बँका बंद असतील. त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 8 रोजी मोहरमनिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये बँका बंद राहणार आहेत. 9 रोजी मोहरमनिमित्त महाराष्ट्रासह त्रिपुरा, गुजरात, मिझोराम, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, नवी दिल्ली, बिहार, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये बँका बंद असतील. 11 रोजी रक्षाबंधननिमित्त राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील. 12 रोजी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बँका बंद असतील.

13 रोजी दुसरा शनिवार, 14 रोजी रविवार आणि 15 रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने या तिन्ही दिवशी बँका बंद राहणार आहेत. 16 रोजी पारशी नववर्ष दिनानिमित्त केवळ महाराष्ट्रात बँका बंद राहतील. 18 रोजी जन्माष्टमीमुळे उत्तर प्रदेश, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये बँका बंद राहणार आहेत. 19 रोजी जन्माष्टमीमुळे मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, सिक्‍कीम, चंदीगड, राजस्थान, जम्मू, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, हिमाचल आणि श्रीनगरमध्ये बँका बंद असतील.

20 रोजी जन्माष्टमीमुळे हैदराबादेत बँका बंद असतील. 21 रोजी रविवार असल्यामुळे आणि 29 रोजी श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त आसामात बँका बंद राहतील. 27 व 28 ऑगस्ट रोजी चौथा शनिवार आणि रविवार असल्यामुळे बँका बंद असतील, तर 31 रोजी गणेश चतुर्थीमुळे महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये बँका बंद राहणार आहेत.

Back to top button