अमित शहा, स्मृती इराणी यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट | पुढारी

अमित शहा, स्मृती इराणी यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचे प्रकरण गाजत असतानाच गृहमंत्री अमित शहा तसेच महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी स्वतंत्रपणे राष्ट्रपतींची भेट घेतली. इराणी यांच्यासमवेत त्यांच्या खात्याचे राज्यमंत्री महेंद्र मुंजपारा आणि जॉन बारला हे उपस्थित होते. गेल्या 25 तारखेला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदावर स्थानाप्पन झाल्या होत्या. तेव्हापासून अनेक राज्यांचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुर्मू यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.

ज्या लोकांनी मुर्मू यांची गेल्या काही दिवसांत भेट घेतली आहे, त्यात कायदा मंत्री किरेन रिजिजू, राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग, ओडिशाचे राज्यपाल गणेश लाल, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आदींचा समावेश होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button