संसदेचा योग्य मान राखला जावा : पंतप्रधान मोदी यांचे खासदारांना आवाहन | पुढारी

संसदेचा योग्य मान राखला जावा : पंतप्रधान मोदी यांचे खासदारांना आवाहन

वी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या धर्तीवर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सर्व खासदारांनी संसदेचा योग्य मान राखावा असे आवाहन केले आहे. ते संसदभवन परिसरातून आज (दि. १८) पत्रकारांशी बोलत होते.

आजपासून सुरु होणारे संसदेचे अधिवेशन महागाई, अग्नीवीर मुद्दा, असंसदीय शब्द आदी विषयांवर गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच २४ नवी विधेयकेही या अधिवेशनामध्ये मांडली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी खासदारांना शांततेचे आवाहन केले आहे. आम्ही ससंसदेला तीर्थक्षेत्र मानतो, इथे मोकळ्या मनाने विचार विनिमय झाला पाहिजे जेणेकरून नीती व निर्णयांमध्ये सकारात्मक बदल होतील होतील तसेच देशाचा विकस जलद गतीने होतोय, असेही ते यावेळी म्हणाले.

हे वाचलंत का ?

Back to top button