शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चिमुरडीचा काही तासातच आढळला मृतदेह | पुढारी

शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चिमुरडीचा काही तासातच आढळला मृतदेह

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कल्याणपूरच्या दौलतपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह गोणीत भरलेला आढळून आला आहे. या घटनेमुळे दौलतपूर गावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी तीन संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावातील प्राथमिक शाळेत शिकत होती. मंगळवारी सकाळी दहा वाजता शाळेत जाण्यासाठी घरून निघाली होती मात्र ती घरी परतलीच नाही. तिचा कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती काही सापडली नाही. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी ती गायब झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली.

पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मुलीचा शोध सुरू केला. बरीच शोधाशोध केल्यानंतर गावातीलच एका घरात मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांना तिचा मृतदेह गोणीत भरलेला आढळून आला. ताे मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांनाही ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

फतेहपूरचे एसपी राजेश सिंह यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मुलीचा शोधा शोध सुरू केला. बरीच शोध केल्यानंतर गावातीलच एका घरातून मुलीचा मृतदेह आढळला. मुलीचा मृतदेह गोणीत भरलेला होता. मुलीच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला. पोलिसांनीही बलात्कार केल्याची शंकाही व्यक्त केली आहे. त्यानी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याची माहिती मिळू शकते.

Back to top button