जॉन्सन अँड जॉन्सन : बालकांवरील चाचण्यांसाठी 'सीडीएससीओ' कडे मागितली परवानगी | पुढारी

जॉन्सन अँड जॉन्सन : बालकांवरील चाचण्यांसाठी 'सीडीएससीओ' कडे मागितली परवानगी

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : जॉन्सन अँड जॉन्सन : कोरोना लसी संबंधी बालकांवर अभ्यास करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा विनंती अर्ज जॉन्सन अँड जॉन्सन कडून केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडे (सीडीएससीओ) सादर करण्यात आला आहे.

भारतात १२ ते १७ वयोगटातील मुलांवर कोरोना लसीसंबंधी अभ्यास करण्यासाठी हा विनंती अर्ज करण्यात आला आहे. लसीच्या तिसऱ्या टप्यातील चाचण्यांनंतर कंपनीची लस ८५ टक्के प्रभावकारक असल्याचे बोलले जात आहे.

मंगळवारीच यासंबंधीचा अर्ज सीडीएससीओ कडे सादर करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मुलांसह सर्व वर्गातील नागरिकांना कोरोना संसर्गाविरोधातील लस लावणे आवश्यक असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कंपनीच्या सिंगल यूज डोसला यापूर्वीच आपात्कालीन वापरास मंजूरी मिळाली आहे.कंपनीने हैद्राबाद येथील बायोलॉजिकल ई लिमिटेड सोबत यासंबंधी करार केला असून या कंपनीच्या माध्यमातून भारतात या लसीचा पुरवठा केला जाईल.

जॉन्सन अँड जॉन्सन ची लस गंभीर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये ८५ टक्के प्रभावकारक असल्याची माहिती समोर आली आहे.

लवकरच मुलांसाठी देखील लस उपलब्ध होईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच सांगितले होते. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला च्या लसीवर अभ्यास सुरू असून चाचणीचे निष्कर्ष पुढील महिन्यात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती.

सीरम संस्थेला देशात २ ते १७ वयोगटातील ९२० बालकांवर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांकरीता परवानगी देण्यात यावी, अशी शिफारस गेल्या महिन्यात भारतीय औषध नियामकाकडून करण्यात आली होती, हे विशेष

 हे ही वाचलं का?

पुणे वाहतूक पोलिसांची सामान्यांवर मुजोरी

Back to top button