

पुणे; पुढारी ऑनलाईन : राज ठाकरे : राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद फोफावल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. मी बोलण्यामागे महाराष्ट्र जातीपातीच्या विचारातून बाहेर पडण्याच्या दृष्टीकोनातून होते असे ते म्हणाले.
मी प्रबोधनकार ठाकरे वाचले, यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत असे म्हणत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
राज यांनी प्रबोधनकार वाचावेत या शरद पवारांच्या वाक्याचा अर्थ समजला नसल्याचे ते म्हणाले. राज यांनी यावेळी आरक्षणावर भाष्य केले. आरक्षण मिळणार नसेल, तर स्पष्ट सांगा. माथी कशासाठी भडकावता असे ते म्हणाले.
राज म्हणाले की, आपण अजूनही जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही निवडणुकीच्या भाषणांमध्ये रस्ते, पाणी, विज अशी तीच आश्वासने दिली जातात. त्यामुळे एवढ्या वर्षांमध्ये आपण काय मिळवलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण १९९९ साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण त्यानंतर द्वेष वाढला, हे माझं वाक्य होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो वाढला असेही मी म्हणालो होतो.
हे ही वाचलं का?