जुळून येती रेशीमगाठी फेम सायली देवधर विषयी माहिती आहे का?

सायली देवधर
सायली देवधर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री सायली देवधर विषयी या पुढील गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसाव्यात. सायली देवधर रिअल लाईफमध्येही तितकीचं सुंदर आहे. जितकी ती छोट्या पडद्यावर दिसते. तिने लेक माझी लाडकी, जुळून येती रेशीमगाठी यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

अधिक वाचा –

सध्या ती 'वैदेही' – शतजन्माचे आपुले नाते या मालिकेत अभिनय करतेय. यामध्ये तिची वैदेहीची भूमिका आहे.

अधिक वाचा –

सायलीने पुण्यातील अभिनव कला केंद्र या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्यातील एका ग्रुपसोबत तिने नाटकदेखील केले आहे.
गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तिने संगीतकार आणि गायक गौरव बुरसेशी साखरपुडा केला होता. त्यानंतर तिच्या लग्नातील फोटो व्हायरल झाले होते.

सायलीच्या लग्नातील फोटो अभिनेत्री प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर तिने स्वत: लग्नातील काही फोटो शेअर केले होते.

अधिक वाचा –

सायलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. एका फोटोतील तिचा दाक्षिणात्य लूक सर्वांचं लक्ष वेधून घणारं आहे. पण, सायली आधीपेक्षा खूपचं सुंदर दिसतेय. तिचं रुप आणखी खुललं आहे.

सायली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे अनेक एकापेक्षा एक फोटो इन्स्टाला पाहायला मिळताहेत. गॉर्जियस सायलीचे हे फोटो भूरळ घालणारे आहेत.

वैदेही – शतजन्माचे आपुले नाते नवी मालिका

वैदेही' – शतजन्माचे आपुले नाते या नव्या मराठी मालिकेत सध्या सायली काम करतेय. यामध्ये ती वैदेहीचे पात्र साकारताना दिसतेय. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेहीचे फुलांचे दुकान आहे. ती फुले विकून घर चालवते.

ती रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या गळ्यात राम नावाचे पेंडेंट आहे. ती प्रभू श्री राम यांच्याकडे आपल्या मनातील सर्व काही गोष्टी बोलते. श्री रामांना तिच्या मनातील सर्वकाही माहित असतं, असं वैदेही म्हणते. तिची आई, दिशा, मनीषाला माहित नसेल कदाचित पण, श्री रामांना सर्वकाही माहित असतं, असं ती म्हणते.

दिशा ही तिची छोटी बहिण आणि मनीषा मोठी बहिण आहे. दिशाला मोठं होण्याची फार घाई आहे. आणि मनीषा ताई अजून लहान मुलासारखी वागतेय. अलोक हा शेंडेफळ आहे. तो हुशार आणि मेहनती असल्याचे वैदेही म्हणते.

वैदेही गातेदेखील सुंदर. ती लोकांसाठी धावून जाते. तिचा मदत करणारा स्वभाव आहे. पण, तिच्या मनात कुठलंही स्वार्थ नाही. कुठलाही स्वार्थ नसताना जर एखाद्याला मदत केली तर ती वाया जात नाही, असं तिचं म्हणणं आहे.

देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं ती सांगते. वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी आहे आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय.

मालिकेत वैदेहीचा एक वेगळा गेटअप आहे. अगदी साधा मेकअप आहे. तिने साईड वेणी ठेवलेली आहे. तिच्या डोक्यावर प्रचंड कामाचं ओझं आहे. त्यामुळे तिची साधी राहणीमान दाखवण्यात आलीय.

ती या मालिकेनिषयी म्हणते की-नेहमी आपण पाहतो की, सासू-सुनेची भांडणे असतात. सावत्र आई-सख्खी आई वाद असतो. किंवा एखादी लव्हस्टोरी वगैरे. असे मालिकेत वेगवेगळे विषय असतात. पण, या मालिकेत मुलींच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय.

ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

हेदेखील वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news