नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात सोने दरात (Gold Price Today) आज शुक्रवारी (दि.२०) आज काही प्रमाणात तेजी दिसून आली. बुधवारच्या तुलनेत आज शुक्रवारी २४ कॅरेट सोने (Gold Price Today) १३५ रुपयांनी महागले. यामुळे सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४७,४११ रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण दिसून आली.
गेल्या वर्षी सोन्याचा भाव ५६,६०० रुपयांवर पोहोचला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याचा दर ८,७०० रुपयांनी कमी आहे. सोन्याची मागणी वाढत असल्याने दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्लेवर्स असोशिएशनने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७,४११ रुपये (प्रति १० ग्रॅम) आहे. तर २३ कॅरेट सोने ४७,२२१ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,४२८ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ३५,५५८ रुपये एवढा आहे.
चांदीचा प्रति किलो भाव ६२,४७१ रुपये एवढा आहे.
गुरुवारी (दि.१९) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. ही घसरण ०.७ टक्के एवढी होती. यामुळे सोन्याचा दर प्रति औंस १,७७४.४१ डॉलरवर आला. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम).
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातदेखील घसरण झाली होती. ही घसरण १.६ टक्के असून चांदीचा दर प्रति औंस २३.१० डॉलरवर आला होता.
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक वृद्धीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम कमोडिटी मार्केटवर होताना दिसत आहे.